जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन
तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण आणि 2023 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. त्यांच्या वडिलांचे नाव उस्ताद अल्लाह राखा कुरेशी आणि आईचे नाव बीवी बेगम होते. झाकीर यांचे वडील अल्ला राख हेही तबलावादक होते.
झाकीर हुसेन यांचे सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमधून झाले. याशिवाय मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधूनही पदवीचे शिक्षण घेतले.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी अमेरिकेत पहिला कॉन्सर्ट केला होता. 1973 मध्ये त्यांनी त्यांचा पहिला अल्बम ‘लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड’ लाँच केला.
झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7व्या वर्षी केली तबला शिकण्यास सुरुवात
झाकीर हुसैन हे प्रसिद्ध दिवंगत तबला संगीतकार अल्लाह राखा खान यांचा मुलगा आहे.अनेक प्रसिद्ध भारतीय आणि परदेशी चित्रपटांसाठी त्यांनी तबला वाजवला आहे. झाकीर हुसैन यांनी वयाच्या 7 व्या वर्षी तबला शिकण्यास सुरुवात केली. वयाच्या 12 व्या वर्षी देशभरात फिरताना त्यांनी परफॉर्म करण्यास सुरुवात केली.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
सुमारे चार दशकांपूर्वी उस्ताद झाकीर हुसैन संपूर्ण कुटुंबासह अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थायिक झाले.झाकीर हुसैन यांना देश-विदेशातील अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
या पुरस्कारांनी झाकीर हुसैन यांचा सन्मान
त्यांना भारत सरकारने 1988 मध्ये पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, 2023 मध्ये पद्मविभूषण यासारख्या सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.झाकीर हुसैन यांना 1990 मध्ये संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च संगीत पुरस्कारही मिळाला होता.
चार वेळा ग्रॅमी पुरस्काराने सन्मान
2009 मध्ये 51 व्या ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.उस्ताद झाकीर हुसैन यांना त्यांच्या कारकिर्दीत 7 वेळा ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते, त्यापैकी त्यांना हा पुरस्कार चार वेळा मिळाला होता.