पुण्यातून इंजिनिअरिंग करायला किती फिस लागते;कोणत्या कॉलेजमध्ये किती फिस लागते
पुण्यामधल्या सर्वांत बेस्ट असलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसपैकी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी आणि एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी यांचा समावेश आहे.
पुण्यामध्ये १६६ पेक्षा जास्त इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. त्यांपैकी १५३ खाजगी आणि १३ शासकीय आहेत. (Engineering Colleges In Pune)
पुण्यामध्ये सर्वोत्कृष्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर एमएचटी, सीईटी, जेईई मेन, जीएटीई इत्यादी प्रवेश परीक्षांमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण व्हावं लागतं. यांपैकी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या गटचर्चा किंवा वैयक्तिक मुलाखतीच्या अनेक फेऱ्या घेतल्या जातात. त्या पार केल्यानंतर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेता येतं. (Engineering Colleges In Pune)
पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून उत्तीर्ण होणारे विद्यार्थी साधारणपणे ₹१६ लाख वार्षिक पॅकेजची अपेक्षा करू शकतात. विद्यार्थ्यांच्या प्रगतीनुसार आणि अनुभवानुसार हे पॅकेज वर्षाला ₹५० लाख पर्यंत वाढू शकतं. पुण्यातल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी टॉप रिक्रूटर्समध्ये टाटा मोटर्स, रिलायन्स जिओ, बॉश, टीसीएस, महिंद्रा डिफेन्स सिस्टम, एचसीएल, कॅपजेमिनी आणि डीआरडीओ या कंपान्यांचा समावेश आहे. (Engineering Colleges In Pune)
◆ पुण्यातले सर्वोत्कृष्ट शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते आहेत?
खाली पुण्यातले सर्वोत्कृष्ट शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्यांच्या सरासरी वार्षिक शिक्षण शुल्काची माहिती दिली आहे. ही माहिती पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोलाची ठरू शकते. (Engineering Colleges In Pune)
● सीओईपी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹८४,२५०
● एआयटी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹२,५०,५२०
● आयआयआयटी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹२,३५,७००
● व्हिएसआय, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹४१,०००
● आयआयएसइआर, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹५८,८००
● गव्हर्नमेन्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹२४,७६८
● सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹१,२१,०००
● महात्मा फुले कृषी विद्यापीठ, पुणे – ₹२४,४५०
● डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल युनिव्हर्सिटी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹८३,८८०
● एनआयसीएमएआर युनिव्हर्सिटी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹३,००,५२०
◆ पुण्यातले सर्वोत्कृष्ट खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेस कोणते आहेत?
खाली पुण्यातल्या सर्वोत्कृष्ट खाजगी इंजिनिअरिंग कॉलेज आणि त्यांच्या सरासरी वार्षिक शिक्षण शुल्काची माहिती दिली आहे. ही माहिती पुण्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना मोलाची ठरू शकते.
● डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹१,५६,०००
● बिव्हीडीयू, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹१,५७,०००
● एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे – ₹३,१५,०००
● विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, पुणे -वार्षिक शिक्षण शुल्क ₹१,५०,०००
● पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹१,४६,०००
● एमकेएसएसएस’ कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,पुणे – वार्षिक शिक्षण शुल्क ₹२,०७,०००