महाराष्ट्रमुंबई

महायुतीने रचला राजकीय इतिहास;तब्बल २३५ जागांवर विजय

महायुतीने विधानसभा निवडणुकीत मविआचा सुपडा साफ केला. २८८ पैकी महायुतीने तब्बल २३५ जागांवर विजय मिळवला. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात आतापर्यंत कोणत्याही युती अथवा आघाडीला इतकं स्पष्ट बहुमत मिळालं नव्हतं.

महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला न भूतो न भविष्य असं यश दिले. भाजप १३२, एकनाथ शिंदेंची शिवसेना ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ४१ उमेदवार विधानसभेवर गेले आहेत. महायुतीच्या जनसुराज्य पक्षाचे २, राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पक्ष १, राजर्षि शाहू आघाडी १ आणि रासपाला एका जागेवर विजय मिळलाय.

लोकसभेला जोमात असलेल्या मविआ विधानसभेला मात्र चारी मुंड्या चीत झाली आहे. महायुतीच्या तिन्ही पक्षाला मिळून ५० संख्याही गाठता आली नाही. महायुतीमध्ये उद्धव ठाकरे यांना सर्वाधिक २० जागांवर विजय मिळाला आहे. तर काँगरेस १६ आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवरच विजय मिळाला. १२३ जागा लढणाऱ्या मनसेच्या पदरी निराशा पडली, एकाही जागेवर त्यांना विजय मिळवता आला नाही. महायुतीचा न भूतो न भविष्य असा विजय झाला आहे. दणदणीत विजया मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मतदारांचे आभार मानले, त्यानंतर राज्याचा गतिमान विकास करणारे सरकार देऊ, अशी ग्वाही तिन्ही नेत्यांनी दिली.

मोदी लाटेत स्वबळावर लढताना भाजपने १२२ जागांवर विजय मिळवला होता. तर २०१९ मध्ये एकसंध शिवसेनेसोबत युतीत लढताना भाजपला १०५ जागांवर विजय मिळाला होता. २०२४ विधानसभेला भाजपने मित्रपक्षासोबत १५२ जागांवर निवडणूक लढवली होती. भाजपने मित्रपक्षासह १३७ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपच्या विजयाचा स्ट्राईक रेट ९० टक्के इथका राहिलाय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने ८७ जागा लढवल्या होत्या, त्यात त्यांना ५७ जागावर विजय मिळला, त्यांचा स्ट्राईक रेट ६६ इतका राहिला. अजित पवार यांनाही भरघोस यश मिळाले.

महायुतीच्या सर्व नेत्यांचा दणदणीत विजय झाला. त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार मोठ्या फरकाने विजयी झाले. सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजान, चंद्रकांत पाटील, अतुल सावे, मंगलप्रभात लोढा, छगन भुजबळ, गुलाबराव पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, उदय सामंत, दीपकर केसरकर, शंभूराज देसाई यांना मोठं मताधिक्य मिळालं.

दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबरी धक्के बसले आहे. मविआच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना कराा लागला. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, वैभव नाईक यांच्यासह अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागलाय. महायुतीच्या त्सुनामीपुढे मविआ चारी मुंड्या चीत झाली आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे यांचा करिष्मा फेल ठरल्याचं निकालावरुन दिसत आहे.

पक्षनिहाय आकडेवारी

क्र. पक्ष विजयी आमदार
1 भारतीय जनता पार्टी – भाजपा १३२

2 शिवसेना ५७

3 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ४१

4 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) २०

5 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस १६

6 राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार १०

7 समाजवादी पक्ष – सपा २

8 जन सुराज्य शक्ती २

9 राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष १

10 राष्ट्रीय समाज पक्ष १

11 ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन १

12 भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) – सीपीआय(एम) १

13 भारतीय शेतकरी आणि कामगार पक्ष १

14 राजर्षी शाहू विकास आघाडी १

15 अपक्ष २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *