महाराष्ट्रमुंबई

संभाव्यच्या यादीमुळे भावीमध्ये उत्साह तर कुंठल्याच उमेदवाऱ्या फायनल नसल्याने तिढा कायम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Election 2024) पार्श्वभूमीवर महायुतीच्या जागावाटपाच्या संदर्भाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दिल्लीत अमित शहा (Amit Shah) यांच्यासोबत (दि.१८) बैठक झाली.उमेदवार यादी फायनल झाल्यावरच घोषणा होणार आहे

तर राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या विधानसभेसाठी जागा वाटप केली जातेय.सर्वच पक्षांनी संभाव्य म्हणू म्हणू अनेकांना कामाला लावले आहे पण प्रत्यक्षात खरे अद्यापही उघड झाले नाही

नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची तारीख जवळ येऊ लागली आहे तरीही जागा वाटपाचा घोळ कायम आहे आज उद्या करत युती आणि आघाडीत जागा वाटपात रस्सीखेच सुरू आहे

काही माध्यमातून टीआरपी वाढवण्यासाठी संभाव्य याद्या जाहीर केल्या जात आहेत तर काहींनी सूत्रांचे हवाले देत अनेक उमेदवारांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून बसवले आहे,एखादी बातमी समोर आली की सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात भावीचे कार्यकर्ते जल्लोष साजरा करू लागले आहेत

महायुती आणि महाविकास आघाडीच्या स्वतंत्र पत्रकार परिषद होणार असून त्याच वेळी जागा वाटपाची यादी जाहीर होणार आहे महाविकास आघाडीची आज किंवा उद्या पत्रकार परिषद होण्याची शक्यता असून युती उमेदवाराची यादी दिल्लीतून फायनल होऊन येत आहे त्यामुळे कुणाला उमेदवारी मिळणार आणि कुणाला नाही हे अद्यापही समोर आलेले नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *