ऑनलाइन वृत्तसेवा

सावधान;तपास यंत्रणा सतर्क,आता मोबाईल वापरावर बंधने;होऊ शकते तुरुंगवासाची शिक्षा

आजकाल प्रत्येकजण मोबाइल फोनचा वापर करत आहे. मात्र, सायबर गुन्ह्यांमध्ये आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये या टेलिकॉम रिसोर्सेसचा मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचं समोर आलं आहे. फोनद्वारे चांगलं आणि वाईट कामही करता येतं. फोनमधल्या इंटरनेटचा वापर करून कोणत्याही चांगल्या किंवा वाईट गोष्टी सर्च केल्या जाऊ शकतात. आपण चुकीच्या कारणासाठी मोबाइलचा वापर केला आणि तपास यंत्रणांच्या रडारवर आपण आलो तर अडचणी वाढू शकतात. त्यामुळे कायद्याच्या कक्षेत राहून फोन कसा वापरला पाहिजे, याची प्रत्येकाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे.

तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आपलं दैनंदिन आयुष्य फार सोपं झालं आहे. तंत्रज्ञानाचे अनेक तोटेही आहेत. हॅकिंग, बँक खात्यांशी संबंधित फसवणूक, चाइल्ड पोर्नोग्राफी यांसारख्या घटना वाढत आहेत. अनेक युझर्स अनैतिक कामांसाठी फोनचा वापर करतात. त्यांना असं वाटतं, की ते पकडले जाणार नाहीत; पण असे लोक कायद्याच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत. तपास यंत्रणा तंत्रज्ञानाचा वापर करून अशा लोकांपर्यंत सहज पोहोचू शकतात. फोनचा वापर करून गंभीर गुन्हा केल्यास, संबंधित युझरला तुरुंगवासाची शिक्षा देखील होऊ शकते.

चाइल्ड पोर्नोग्राफी :

पोक्सो कायद्यानुसार मोबाइल फोनवर चाइल्ड पोर्नोग्राफी पाहणं हा गंभीर गुन्हा आहे. सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्यानुसार, या गुन्ह्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.

बॉम्ब बनवण्याची कृती सर्च करणं :

जर तुम्ही गुगलवर बॉम्ब बनवण्याची कृती सर्च केली तर त्याचे परिणाम वाईट होऊ शकतात. कदाचित तुम्ही गंमत म्हणून सर्च केलेला हा प्रकार तुम्हाला संकटात टाकू शकतो. गुगल अशा प्रकारच्या सर्चेसना गांभीर्याने घेतं आणि तुमची माहिती सुरक्षा यंत्रणांशी शेअर करू शकते.

पायरसी :

चित्रपट पायरसीबाबत कडक कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. पायरेटेड चित्रपट डाउनलोड करणं बेकायदा आहे. त्यासाठी लाखो रुपयांचा दंड होऊ शकतो.

एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर करणं :

यामुळे एखाद्या व्यक्तीची प्रायव्हसी नष्ट होऊ शकते. त्यामुळे हा प्रकार गुन्हा मानला जातो. जर तुम्ही एखाद्याच्या परवानगीशिवाय त्याचे फोटो किंवा व्हिडिओ शेअर केले आणि त्या व्यक्तीने तुमच्याविरोधत तक्रार केली तर तुम्हाला तुरुंगवासदेखील होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *