बिंदुसरा ओव्हर फ्लो;महापुराची शक्यता;प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
बीड/प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात यंदा पावसाळा संपण्याच्या मार्गावर असतानाच बिंदुसरा धरण ओव्हर फ्लो झाले आहे जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून परतीच्या पावसाने चांगली हजेरी लावल्याचे दिसून आले आहे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळे बिंदुसरा धरण ओसंडून वाहत आहे त्यामुळे अतिवृष्टी मुळे महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे यासाठी नगरपालिका प्रशासन आणि तहसीलदार यांनी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे
जाहीर आवाहन
बीड नगर परिषद हद्दीतील बिंदुसरा नदीच्या पुर नियंत्रन रेषेत राहणाऱ्या सर्व नागरिकांना जाहिर आवाहनाव्दारे कळविण्यात येत आहे की, बिंदुसरा धरण हे पुर्णपणे भरलेले असुन ओसंडून वाहत आहे व अतिवृष्टीमुळे कोणत्याही क्षणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन महापुर येण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे जिवीत व वित्त हाणी होण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. तरि पुर नियंत्रण रेषेत राहणाऱ्या सर्व नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे व कुठल्याही प्रकारची जिवीत, वित्त हाणी होणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन मुख्याधिकारी नगर परिषद व तहसीलदार बीड यांनी केले आहे.
बिंदुसरा धरण व खटकाळी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण सांडव्या वरुन मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून प्रकल्पातून नदीपात्रात जवळपास 400 क्यूसेक्स पाणी नदी पात्रात येत आहे.
आज रविवारी (1 सप्टेंबर) रात्रीला मोठा पाऊस झाल्यास बिंदुसरा नदीपात्रात पाणी वाढ होऊ शकते. त्यामुळे नदीपात्रातील व नदीकाठावरील सर्व नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
000000