बीड

जिथे विश्वास सार्थकी लागतो तिथेच पैसा गुंतवा-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बीड दि.04(प्रतिनीधी)ः- पारदर्शक व्यवहारामुळेच गजानन बँकेला संपूर्ण राज्यातून प्रथम दर्जाचा मान मिळाला आहे. बाजारपेठेत काही ठिकाणी अस्थिरता आहे ग्राहकांना फायदा होण्याऐवजी तोटाच होऊ लागला आहे त्यामुळे आपला विश्वास जिथे सार्थकी लागतो तिथेच आपला पैसा गुंतवावा असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले असून आज गजानन सहकारी बँकेच्या एटीएम सेवेचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला.
बीड येथील श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या वतीने एटीएम सेवेचा शुभारंभ माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे, अरुण डाके, गंगाधर घुमरे ,विलास बडगे, बाबुशेठ लोढा, गणपत डोईफोडे, शिवाजीराव जाधव, नगरसेवक मुखीद लाला, खदीर भाई, अ‍ॅड.सय्यद खाजा, जमील भाई, सखाराम मस्के, नानासाहेब काकडे, विजय सरवदे, सतपाल लाहोट, सुभाष क्षीरसागर, नवनाथ घोडके, कल्याण खांडे, अर्जुन बहिरवाळ, नागसेन मस्के, राणा चौहाण, बंडू निसर्गंध, प्रकाश कानगावकर, प्रकाश इंगळे, दादासाहेब मुंडे, शेख नसीर, मैनू मौलाना, अक्षय रणखांब आदी मान्यवर उपस्थित होते.


यावेळी पुढे बोलताना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आज गजानन बँकेच्या एटीएम सेवेचा शुभारंभ होत आहे. दैनंदिन गरज आणि सरळ सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही सुविधा उपलब्ध केली आहे. गजानन बँक ही सामान्य ग्राहकांची बँक झाली आहे ठेवीदारांचा विश्वास जपत बँक व्यवहार करत असून मराठवाड्यात शाखा विस्तार होत आहे. पारदर्शकतेमुळेच बँकेला प्रथम दर्जाचा मान मिळाला असून बाजारपेठेत काही ठिकाणी सध्या अस्थिरता निर्माण झाली असून ग्राहकांना फायदा होण्याऐवजी तोटेच सहन करावे लागत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने आपला विश्वास जिथे सार्थकी लागतो तिथेच आपला पैसा गुंतवावा खाजगी बँकांवर अनेक आव्हाने आहेत तरीसुद्धा नियमानुसार ज्या बँकांचे व्यवहार सुरू आहेत
सध्या शहराचे काही प्रश्न भेडसावत आहेत पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यासाठी 16 बैठका झाल्या पण हा प्रश्न कायम आहे यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे अनेक विकासाचे प्रश्न सोडून घेण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असतो. शासन दरबारी कायमस्वरूपी प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य समजतो सध्या सामान्य नागरिकांनी डोळसपणे आगामी काळात विचार करण्याची गरज आहे असे सांगून त्यांनी उपस्थित ग्राहकांना एटीएम सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी बँकेचे संचालक अरुण गोरे, अ‍ॅड.राजेश तांगडे, दिनकर कदम, राजेंद्र मुनोत, शेख हुसेन, शरद ढाकणे, अ‍ॅड.दत्तात्रय डोईफोडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव क्षीरसागर, सरव्यवस्थापक डॉ.एम.एस. शेख, व्यवस्थापक व्हि.एल. कुंबेफळकर, सहाय्यक व्यवस्थापक के.ए. लांडे, आय.टी.व्यवस्थापक अनंत आडसुळे यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे यांनी केले यावेळी त्यांनी 150 महिला बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिले असून सर्वसामान्य माणसाला 50 हजार ते 2 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले असल्याचे सांगितले सामान्य माणसाच्या ठेवीला सुरक्षितता असून आरबीआयच्या नियमानुसार गजानन बँकेचे व्यवहार चालू असल्याचे ते म्हणाले. श्री गजानन नागरी सहकारी बँकेच्या वतीने एटीएम सुविधा सुरू केल्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे आभार आदेश नहार यांनी मानले. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात गणेश लोखंडे, सुरवसे, शेख मोहसीन यांचा सत्कार करण्यात आला तर आर्किटेक्ट इंजिनियर जीवन डोळस आणि खातेदार शेख जमील यांचाही बँकेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *