बीड

दोन वर्षांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात;ई- केवायसी करण्याचे आवाहन

बीड, दि. 27, (जि. मा. का.) माहे सप्टेबर, ऑक्टोबर 2022 मध्ये अतिवृष्टी तसेच सततच्या पावसामुळे झालेले शेतपिकांचे नुकसान आणि माहे मार्च, एप्रिल 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे व दुष्काळ 2023 मध्ये झालेले शेतीपिकांचे नुकसानापोटी बीड जिल्ह्यातील 964804 बाधित शेतकरी लाभार्थ्यांना रुपये 717.09 कोटी अनुदान मंजूर झाले असून सदर अनुदानाचे संगणकीय प्रणाली मार्फत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात निधी वितरण सुरू आहे.

त्यानुसार जिल्ह्यातील 682812 शेतकरी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रुपये 568.52 कोटी अनुदानाचे वितरण झाले असून उर्वरित 281992 शेतकरी लाभार्थ्यांपैकी 101196 लाभार्थ्यांच्या माहिती सबंधी दुरुस्ती करण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी (आधार सेंटरवर जाऊन) BActive करून घेणे व बँक खात्यास आधार मॅपिंग करण्यात यावे.
सद्यस्थितीमध्ये 180796 लाभार्थ्यांपैकी 72410 लाभार्थ्यांनी ग्राम स्तरावर प्रसिद्ध झालेल्या विशिष्ट क्रमांक यादी लिस्ट मधील अनुक्रमांकनुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रणानीकरण (ई- केवायसी) करणे आवश्यक आहे. याची तालुका निहाय आकडेवारी खालील प्रमाणे आहे. खालील प्रमाणे शेतकरी यांनी (Vk नंबर) नुसार आपले सरकार सेवा केंद्र, नागरी सुविधा केंद्र येथे आधार प्रमाणीकरण (ई केवायसी) तात्काळ करून घेण्यात यावी.
अंबाजोगाई-11673,बीड-11000,आष्टी-7166,धारुर-7018,माजलगाव-6926,केज-6833,पाटोदा- 5634,शिरुर कासार-4719,वडवणी-4485 गेवराई-4277 आणि परळी 2679 एकूण 72410 तसेच अंबाजोगाई, वडवणी व धारुर या तालुक्यात खरीप 2023 मध्ये दुष्काळ घोषित झाला असून या तालुक्यात 11089 शेतकरी लाभार्थ्यांनी आपली माहिती (आधार कार्ड व बॅक पासबुकची प्रत) संबंधित गावचे ग्रामसेवक, तलाठी यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बीड यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *