ऑनलाइन वृत्तसेवापुणे

मान्सूनची प्रतीक्षा संपली;मराठवाड्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता

मान्सूनची प्रतीक्षा संपली आहे. मान्सून मुंबईत धडकला आहे. राज्यातही अनेक भागात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. मुंबईत मान्सूनचं आगमन झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

पुढील 24 तासात मुंबई, ठाणेसह राज्यात पावसाचा अंदाज असल्याने घराबाहेर पडण्याआधी छत्री, रेनकोट घेऊनच घराबाहेर पडा. जून महिन्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जुले महिन्यात प्रशांत महासागरात ला निना परिस्थिती निर्माण होईल. याच्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जोरदारा पाऊस पडेल, असंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

राज्यात पुढील 24 तासात अनेक ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी पाहायला मिळेल. उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि 30-40 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा पाहायला मिळेल, त्याशिवाय हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दक्षिण कोकण, उत्तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आज तर, उद्या कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यातील विविध भागात पावसाची हजेरी पाहायला मिळेल. गेल्या 24 तासांत मान्सून मुंबईत दाखल झाला असून हळूहळू तो महाराष्ट्र व्यापणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *