महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर;एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला. एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.
त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
यावर्षी एकूण 14 लाख 970 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीच्या परीक्षेचा निकाल 93.37 टक्के इतका लागला आहे. 8782 विद्यार्थ्यांनी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत. तर यंदा केवळ एकाच विद्यार्थिनीला 100 टक्के गुण मिळवण्यात यश आलं आहे.
दरम्यान पुन्हा एकदा कोकण विभागानं बारावीच्या निकालात बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वात जास्त 97.51 टक्के इतका लागला आहे. पुणे 94.44 टक्के, नागपूर 92.12 टक्के, छत्रपती संभाजी नगर 94.08 टक्के, कोल्हापूर 94.24 टक्के, अमरावती 93 टक्के, नाशिक 94.71 टक्के, लातूर 92.36 तर मुंबई विभागाचा सर्वात कमी 91.95 टक्के निकाल लागला आहे.