महाराष्ट्रमुंबई

कायद्यासमोर कुणीही मोठा नसतो;जरांगे यांचे आरोप बिनबुडाचे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सागर बंगला हा सरकारी आहे,कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं.कोणाचीही अडवणूक नाही.मात्र,कोणत्या निराशेतून ते बोलत आहेत, कोणती सहानुभूती हवे आहे ते माहीत नाही.ते जे बोलले ते बिनबुडाचे आहे,धादांत खोटं आहे हे त्यांना सुद्धा माहिती असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते म्हणाले की,मी मराठा समाजासाठी काय केलं? सारथी,अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण हायकोर्टात आणि सर्वोच्च न्यायालयात सुध्दा टिकवलं.त्यामुळे कोणी बोलला म्हणून मराठा समाज विश्वास ठेवेल असं म्हणणारा मी नाही.जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे, पवार साहेब बोलत होते तीच स्क्रिप्ट ते जरांगे का बोलत आहेत? हा प्रश्न आहे.काही अंदाज आम्हाला आहे. आम्ही योग्यवेळी बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल ते सर्व करेल,असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.शेवटी कायदा कुणीही हातात घेऊ नये,कायद्याच्या पुढे सगळे समान आहेत त्यामुळे सरकारचा संयम सुटू देऊ नका असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे

आरक्षण देऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला आहे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देऊन शब्द मुख्यमंत्र्यांनी पाळला असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रत्येक ठिकाणी मदत करण्याचे धोरण सरकारने घेतलं आहे. राज्यात गुंतवणूक देखील येत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी विरोधकांकडून पत्रकार परिषद घेतली गेली नसल्याने टीका केली.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *