बीड

आता माघार नाही;तयारीला लागा, 20 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदानात आमरण उपोषण-मनोज जरांगे पाटील

राज्य सरकार वेळकाढूपणा करत मराठ्यांची फसवणूक करतंय, आम्हाला सुद्धा मर्यादा आहे, आम्ही तरी किती दिवस दम काढणार? मराठ्यांना विचारल्याशिवाय मी काही करणार नाही. आपण फक्त लढायचं नाही तर जिंकायचं सुद्धा आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. त्यामुळे अंतरवाली सराटीनंतर आता मुंबईत धडकायचं आहे असं म्हणत 20 जानेवारीपासून मुंबईत मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करण्याची मोठी घोषणा जरांगे पाटील यांनी केली आहे.बीड येथे सुरू असलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही घोषणा केली,सरकार मराठा समाजाचा अपमान करत आहे पण आम्ही 100 टक्के आरक्षण घेऊनच दाखवू,आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही मी मेलो तरी चालेल पण मुंबई सोडणार नाही,20 जानेवारीला समाजाने शांततेत मुंबईत यायचं आहे,पोलिसांना त्रास द्यायचा नाही,जो कुणी हिंसा करेल तो समाजाचा नसेल,आरक्षणाचा हा शेवटचा टप्पा आहे ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवू,अनुचित प्रकार जो करेल त्याला तातडीने पोलिसांच्या ताब्यात द्या सरकारने आता तरी शहाणपण दाखवावे,मराठे शांत आहेत त्यांना शांततेत राहू द्या आता आरक्षणाचा निर्धारच केला आहे असे सांगून त्यांनी पुढचा इशारा दिला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *