बीड

देशात कोरोना JN1 विषाणू आढळला

नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन

   बीड, दि. 22 (जि. मा. का.)   कोरोनाचा नवा विषाणू JN1  भारतात आढळून आला आहे. याचे काही रुग्ण आपल्या राज्यात देखील सापडले आहेत या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या पद्धतीने काळजी घ्यावी आणि कोरोना होणार नाही व त्याचा प्रसार होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवसहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी केले आहे.
  केरळ राज्यात या प्रकारचे रुग्ण अधिक आहेत त्यानंतर राज्यातही काही रुग्ण आढळून आली. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दुरस्थ संवाद प्रणाली द्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या स्थितीचा आढावा घेतला.
  बीड जिल्ह्यात याची लागण व प्रसार होणार नाही यासाठी नागरिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत एक प्रसिद्धी पत्र जारी करण्यात आले आहे. 
  • यानुसार गर्दीच्या ठिकाणी जात असताना सर्वांनी मास्कचा वापर करावा.
  • प्रवाशांनी प्रवासामध्ये मास्कचा वापर करावा. घरी आल्यानंतर सर्वांनी साबणाने स्वच्छ हात धुवावेत.
  • सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर हात कोणत्याही पृष्ठभागास लावू नयेत.
  • त्याचबरोबर शक्यतोवर हस्तांदोलन करणे टाळावे.
  • शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे परंतु जाणे आवश्यक असल्यास सार्वजनिक ठिकाणी मास घालून जावे आणि खोकताना किंवा शिवताना नाकात तोंडावर रुमाल किंवा मास्क असणे आवश्यक आहे.
  • सार्वजनिक ठिकाणी गेल्यावर उघड्यावर थुंकू नये.
  • हातांच्या स्वच्छतेकरिता वारंवार हात स्वच्छ पाण्याने धुवावेत व सॅनिटायझरचा वापर करावा.
  • सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास तात्काळ डॉक्टरांना दाखवून उपचार सुरू करावेत.
  • सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास उपचार घेणे टाळण्यात येऊ नये.
  • लग्न समारंभ इत्यादी ठिकाणी लोकांनी मास्क घालून जावे, त्या ठिकाणी सामाजिक अंतर ठेवावे तसेच
    *सॅनिटाझर चा वापर त्या ठिकाणी असावा.
    *मधुमेह, हृदयरोग, कर्करोग किडनीचा आजार, श्वसनसंस्थेचे आजार असलेले रुग्ण यांनी वैद्यकीय सल्ला घेऊन आपले आरोग्य चांगले राहिल याची काळजी घ्यावी.
    त्याचबरोबर वृद्ध व्यक्ती, गरोदर माता, एक वर्षाच्या आतील बालके, इत्यादींनी सार्वजनिक ठिकाणी तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. *

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *