वाढत्या वयानुसार निवृत्तीधारकांना मिळणार सरकारचा वाढीव मोबदला
मुंबई: राज्यातील अतीवयोवृद्ध निवृत्ती धारकाना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या आणि ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त आहे अशा निवृत्तीधारकांना केंद्र सरकार प्रमाणे मोबदला (Maharashtra Govt. Servent Pension) मिळणार आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला.
कोणाला काय मोबदला मिळणार?
वय- 80 वर्ष ते 85 वर्ष आहे त्यांना केंद्राप्रमाणे 20 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
85 वर्ष ते 90 वर्षे निवृत्ती धारकांना 30 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
90 वर्ष ते 95 वर्षे निवृत्ती धारकांना 40 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
95 वर्ष ते 100 वर्षे निवृत्ती धारकांना 50 टक्के वाढीव मोबदला मिळणार.
100 आणि त्यापुढील निवृत्ती धारकांना 100 टक्के वाढीव मोबदला मिळणार.