रविवारी घोडके हॉस्पिटलचा नवीनवास्तूत सेवारंभ उदघाटन सोहळा
दि .१०. शहराच्या वैभवात भर टाकणाऱ्या आणि अत्याआधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेले मूळव्याध स्पेशालिस्ट घोडके हॉस्पिटलचा भव्य उदघाटन सोहळा रविवार दि.१० डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता श्रीक्षेत्र नारायणगडचे मठादीपती महंत शिवाजी महाराज व श्रीक्षेत्र चाकरवाडीचे महादेव महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर तसेच जिल्हा शिल्यचिकित्सक डॉ.अशोक बडे, डॉ.अविनाश देशपांडे , डॉ.अजित जाधव, डॉ.मंगेश अंधारे, डॉ.लक्ष्मण जाधव व तसेच रोटरी क्लब ऑफ बीडचे अध्यक्ष कृष्णा खांडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक यंत्राचा वापर करून मुळव्याध आजारावर उपचार करण्यात येतो. हॉस्पिटलमध्ये सुसज्ज आय सी यु, लेसर मशनरी महिलांसाठी स्वतंत्र तपासणी कक्ष, रुग्णांसाठी स्वतंत्र रूमस, जनरल वॉर्ड याच बरोबर अंतर रुग्ण तपासणी कक्ष, रक्त, लघवी तपासण्यासाठी लॅब, मेडिकल स्टोअर, सुविधा उपलब्ध असून रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकासाठी जेवणाची व्यवस्थाही या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे.