लोकनेत्याच्या भूमिकेतून माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर
बीड/प्रशांत सुलाखे
एखाद्या व्यक्तिमत्त्वाला सामर्थ्य, संपन्नता तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आत्मविश्वास कार्यक्षमता स्मरणशक्ती भाषण व संभाषण कला वेळेचे नियोजन ताण-तणावाचे व्यवस्थापन सकारात्मक दृष्टिकोन ध्येयनिष्ठा प्रयत्नांची पराकाष्ठा अशा अनेक प्रकारच्या मार्गाने हे व्यक्तिमत्व विकासाचे मार्ग सोपे करत असतात प्रगल्भ सर्जनशील आणि विकसनशील व्यक्तिमत्व म्हणजेच व्यक्तिमत्त्व विकास होय,
जे जे उत्तम उदात्त उन्नत ते प्रयत्नपूर्वक, श्रद्धापूर्वक, विचारपूर्वक साध्य करण्याचा ध्यास घेऊन आत्मविश्वासाने पुढे जाणारे एक संयमी नेतृत्व म्हणजे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे आहेत आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्त त्यांनी पदावर असताना आणि नसतानाही केलेल्या कामाचा आढावा घेणे क्रमप्राप्त ठरत आहे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर आधी लोकांसाठी आपले योगदान द्यावे लागते,प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होऊन जनसेवेचे व्रत अंगिकारावे लागते,आपल्याकडे आलेला प्रत्येक माणूस कुठल्या ना कुठल्या तरी विवंचनेत असणारा असतो त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सदा तत्परता ठेवावी लागते तरच जनतेतून मतदान रुपी आशिर्वाद मिळतात,हल्ली कुणीही उठतो आणि नेतेगिरी करण्याचा प्रयत्न करतो पण जो जनतेशी बांधील राहून राजकारणात राहतो तोच यशस्वी होतो, मा जयदत्त क्षीरसागर एक परिपक्व नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यातच नव्हे तर सम्पूर्ण राज्यात,देशात परिचित आहे,आपल्या कार्यकुशलतेतून त्यांनी बीड शहरासाठी जिल्ह्यासाठी आणि मतदार संघासाठी कोट्यवधींचा निधी खेचून आणत विकास कामांचा आपला आलेख उंचावत ठेवला आहे,
बीड मतदार संघ आणि जिल्यासाठी मा जयदत्त क्षीरसागर यांनी केलेल्या प्रयत्नामुळे शहरातील जुन्या न्यायालयाजवळच मोठी आणि सुसज्ज व भव्य न्यायालय ईमारत आजही डौलाने उभी आहे,सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्ग पूर्ण व्हावा यासाठी जयदत्त क्षीरसागर यांनी पाठपुरावा केला हा महामार्ग झाल्याने बीडमधून जाणारी जड वाहतूक आता बंद झाली असून जालना रोड ते बार्शी नाका हा रस्ता मोकळा स्वास घेत आहे
ईट येथे अत्याधुनिक गजानन सुत गिरणीची उभारणी केल्याने शेकडो तरुणांना हाताला काम मिळाले आणि शेतकऱ्यांना देखील याचा फायदा होऊ लागला
दूध संघामार्फत दुग्धजन्म पदार्थ निर्मिती चालू असून संघाच्या या उत्पादनाला आता मागणी वाढत आहे
गवारी येथे विद्युत केंद्राची उभारणी केल्याने त्या भागातील जनतेचा वीज प्रश्न सुटला आहे
अनेक गावांना कायम स्वरूपी पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणत तेथे नवीन पाईप लाईनचे काम करून घेतले आहे
चिंचपुर-राजुरी 151 कोटीचा हायवे रस्ता तर
राजुरी-खरवंडी हा मुख्य महामार्ग 180 कोटीचा रस्ता असून यामुळे देशाचा पश्चिम भाग जोडला जाणार आहे,
खोकरमोहा येथे सब स्टेशन
शिरूर का. व फुलसांगवी येथे जि.प.शाळा बांधकाम (सहा कोटी 75 लक्ष)
पूर्वी प्रशासकीय इमारतीत डीपीडिसी हॉल होता पण मा जयदत्त क्षीरसागर यांनी शहरातील डिपीडीसी बिल्डींगची उभारणी करून गैरसोय दूर केली
बीडच्या सरकारी दवाखान्यात नविन 200 खाटांचे स्वतंत्र रूग्णालय व त्याला लगतच आणखी 100 खाटांचे अतिरिक्त रुग्णालय होत आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आपल्या आरोग्य सुविधा मोफत घेता येतील,
समातंर पाणी योजनेअंतर्गत नविन पाईप लाईनचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे,बचत गटाच्या माध्यमातून महिलासाठी प्रशिक्षण व रोजगार निर्मिती
बीड शहरासाठी नविन अद्यावत बसस्थानक मंजुर असून याचेही काम आता पूर्ण होत आहे,घनकचरा व्यवस्थापन साठी 9 कोटी तर सुवर्ण जयंती योजनेतून 35 कोटी रुपये बीडसाठी मिळाले त्यातूनच साठे चौक ते डॉ आंबेडकर पुतळा हा पक्का सिमेंट रस्ता करता आला,
शेकडो महिला बचत गटांना गजानन बॅकेतून अर्थ सहाय्य दिले असून आज याच महिला स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करत आहेत
हरित क्षेत्र योजनेतून 23 उद्यानांना मंजूरी मिळाली शहरात छोटे छोटे उद्यानाची कामे झाली आहेत
बीड शहरात नविन 16 सिमेंट रस्ते (88 कोटी ),व
114 कोटींची अमृत अटल योजनेचे काम पूर्ण आहे,भुयारी गटार योजनेचे काम होत असून यासाठी 163 कोटी मिळाले आहेत,
बार्शी नाका पूलाचे काम पूर्ण झाले असून खासबाग ते मोमीनपुरा पूल,जुना बाजार ते कंकालेश्वर पूल या दोन पूलाचे प्रस्ताव मंजुरीसाठी दाखल आहेत,
माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी ग्रामीण भागातील अत्यावश्यक असणाऱ्या मागण्या लक्षात घेऊन सर्व कामांचे प्रस्ताव विविध योजनांच्या माध्यमातून तयार केले होते त्यापैकी जवळपास सर्वच कामांना मंजुरी मिळाली आहे ग्रामीण भागातील रस्ते ,बंधाऱ्याची कामे आणि सांस्कृतिक सभागृह अशा कामांना प्राधान्य देण्यात आले होते तसेच पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने भविष्यात लोकसंख्या लक्षात घेऊन या गावचे प्रस्तावदेखील मंजूर करण्यात आले,राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत कामांचा यामध्ये समावेश आहे जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत अनेक गावांचा समावेश करण्यात आला ही कामेदेखील तात्काळ झाली, मा जयदत्त क्षीरसागर यांनी मतदार संघातील गावे राज्य रस्ता आणि केंद्रीय रस्त्याला जोडली जावीत यासाठी दाखल करण्यात आलेले प्रस्ताव मंजूर झाल्यामुळे अनेक गावे मुख्य रस्त्याला जोडली जात आहेत शहरासाठी महत्त्वाची ठरणारी अमृत अटल योजना सुरू झाली असून या अंतर्गत अनेक प्रभागात पाईपलाईन रस्ते आणि नाली बांधकामाची कामे पूर्ण केली आहेत
शहरातील जवळपास सोळा मुख्य रस्ते कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचे झालीआहेत त्यामुळे शहराचा गजबजलेला भाग मोकळा श्वास घेत आहे, याचबरोबर भाविकांची मागणी लक्षात घेऊन काळा हनुमान ठाणा ते खंडेश्वरी देवी मंदिरापर्यंतचा रस्ता कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीटचा व्हावा अशी मागणी करण्यात आली होती हे काम देखील पूर्ण झाले आहे,तसेच खंडेश्वरी देवस्थानच्या विकासासाठी नुकतेच 4 कोटी मंजूर झाले आहेत त्यामुळे येथे मोठ्या सुविधा मिळणार आहेत, यापूर्वी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खासबाग देवी मंदिराचा रस्ता सिमेंट काँक्रीटचा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती ती देखील पूर्ण करण्यात आली आहे, याचबरोबर नव्या बीड शहरातून जुन्या बीड शहराला जोडणाऱ्या दोन महत्त्वाच्या पुलांचे प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत ते देखील लवकरच मंजूर होतील या कामासाठी जवळपास 5 कोटी रुपयाचा निधीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दाखल करण्यात आला आहे जुना बाजार ते कंकालेश्वर या दरम्यानचा दगडी पूल आता नव्याने होणार असून यासाठी एक कोटी 85 लाख रुपये तरतूद आहे त्याचबरोबर मोमिनपुरा ते खासबाग यासाठी बिंदुसरा नदी वर एक कोटी 35 लाख रुपये खर्चाचा आणि वीस फूट उंचीचा नवीन पूल बांधण्यात येणार आहे माजी नगराध्यक्ष डॉ भारतभूषण क्षीरसागर यांनी पालिकेच्या माध्यमातून तत्कालीन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे हे प्रस्ताव दाखल केले होते त्यानुसार पर्यटन मंत्रालयाकडे हे प्रस्ताव पाठवण्यात आले असून याचीही मंजुरी मिळणार आहे ही सर्व कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहेत
या व अन्य कामासाठी माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी जे प्रयत्न केले ते बीडची जनता कधीही विसरू शकत नाही म्हणूनच लोकनेत्याच्या भूमिकेत जयदत्त क्षीरसागर कायम आहेतच हे मान्य करावे लागेल म्हणून अशा नेतृत्वाला दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना