पंधरा दिवसात देवस्थान इनाम जमिनी वर्ग1करा अन्यथा 100 जेष्ठ नागरिकांसह उपोषण करणार-विश्वजीत देशपांडे
छ.संभाजीनगर – देवस्थान इनाम जमिनी वर्ग दोन संवर्गातून वर्ग एक करा या मागणीसाठी परशुराम सेवा संघाच्या देवस्थान इनाम जमीन आंदोलन कृती समितीच्या वतीने संभाजी नगरातील कण व समाज भवन येथे इनाम धारक शेतकऱ्यांचा आक्रोश मेळावा आयोजित करण्यात आला होता. या यावेळी बोलताना परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री विश्वजीत देशपांडे यांनी पंधरा दिवसात देवस्थान इनाम जमिनी वर्ग एक करा अन्यथा 100 ज्येष्ठ नागरिकांसह उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. देवस्थान इनाम जमीन असणारे सर्व शेतकरी गेल्या सात दशकांपासून हा अन्याय सहन करत आहे व त्यामुळे सर्व ज्येष्ठ नागरिकांनी या आंदोलनात पूर्ण तयारीने उतरण्याचे ठरवले आहे.
यावेळी जेष्ठ विधिज्ञ व देवस्थान इनाम समितीची सल्लागार ऍड नरेश गुगळे यांनी सखोल मार्गदर्शन केले महाविकास आघाडी काळात स्थापन झालेल्या राजेंद्र शिंगणे समितीत त्यांनी जवळून काम केले आहे सदर समितीने शासनाला या संबंधी सकारात्मक अहवाल दिलेला आहे कायद्याचा मसुदा देखील तयार आहे परंतु राजकीय इच्छाशक्ती नसल्याने हा विषय प्रलंबित आहे असे मत त्यांनी मांडले.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री अनिल मुळे व देवस्थान इनाम जमीन कृती समितीचे समन्वय श्री सुनील कुलकर्णी श्री अरविंद कुलकर्णी यांची समयोचित भाषणे झाली सरकारने येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी या कायद्याला मंजुरी देत असल्याचे जाहीर करावे अन्यथा या उपोषणाचा ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामास सरकार जबाबदार असेल असे जाहीर आवाहन राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्राद्वारे करण्यात येणार आहे असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
यावेळी बाळकृष्ण बडवे गजानन जोशी दीपक ठोंबरे केदार पाटील नागनाथ देशपांडे वसंत किनगावकर यांच्यासह शेकडो इनाम इनामधारक शेतकरी उपस्थित होते श्री दीपक देवळे यांनी आभार प्रदर्शन केले