बीड जिल्हा हादरला;भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू
बीड : आष्टी धामणगावकडून अहमदनगरकडे जात असलेल्या एका ट्रकला व्यंको कंपनीकडे वळण घेत असताना नगरकडे रूग्ण घेऊन जात असलेल्या रुग्णवाहिकेने पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील डॉक्टरसह चौघांचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघातबीड नगर राज्य महामार्गावरील दौलावडगाव नजीक बुधवारी रात्री साडे अकरा वाजेच्या दरम्यान घडला. तर आज सकाळी सहा वाजता दुसर्या अपघातात आष्टी फाटा येथे चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल उलटून सहा प्रवास्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मुंबई वरून बीडकडे निघालेली सागर ट्रॅव्हल ही बीड नगर राष्ट्रीय महामार्गावरील आष्टी तालुक्यातील आष्टा फाटा नजीक आज सकाळी सहाच्या दरम्यान उलटल्याने झालेल्या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमी वर आष्टी,जामखेड येथे उपचार सुरू असल्याचे बोलले जात असून आष्टी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.