देशनवी दिल्ली

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) आज राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. आयोगाने दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. सोमवारी जाहीर झालेल्या वेळापत्रकानुसार मध्य प्रदेशमध्ये 7 नोव्हेंबरला, राजस्थानमध्ये 23 नोव्हेंबरला, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला, तेलंगणामध्ये 30 नोव्हेंबरला आणि मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. 3 डिसेंबरला मतमोजणी होणार असल्याचे आयोगाने सांगितले. 


मध्यप्रदेश, राजस्थान, मिझोराम आणि तेलंगणामध्ये एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर छत्तीसगडमधील निवडणुका दोन टप्प्यात पार पडतील. सर्व राज्यांतील सरकारांचा कार्यकाळ डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024 दरम्यान संपत आहे. मध्यप्रदेशातील 230 जागांवर निवडणूक होणार आहे. तर राजस्थानमध्ये 200, तेलंगणात 119, छत्तीसगडमध्ये 90 आणि मिझोराममध्ये 40 जागांवर निवडणूक होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *