व्वा;आजचे सगळेच अहवाल निगेटिव्ह
बीड जिल्ह्यात कोरोना संशयितांची साखळी आज अखेर संपुष्टात आली बीड जिल्ह्यातून आज नऊ जणांचे अहवाल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते सर्वच्या सर्व अहवाल निगेटिव्ह आले असून कोरोना रुग्णाच्या संपर्कातील एकही रुग्ण आता बीड जिल्ह्यात नाही ही आनंदाची व दिलासा देणारी बाब आहे
बीड जिल्हयातील आज एकूण 9 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.कोरोना संशयितांचे प्रमाण देखील आता कमी झाल्याचे दिसून येत आहे 2 रुग्ण जोखमीचे वगळता आता कोरोना पासून धोका होण्याची शक्यता कमी होत आहे तरीही नागरिकांनी काळजी घेऊनच वावर ठेवला तर बीड जिल्हा कोरोना मुक्त होऊ शकतो