ऑनलाइन वृत्तसेवा

महत्वाची बातमी;शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी;तारीख ठरली

शिवसेनेच्या आमदार अपात्रतेप्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहामध्ये 14 सप्टेंबरला आमदारांच्या अपात्रतेबाबत मॅरेथॉन सुनावणी होणार आहे.

एकाच दिवशी सर्व आमदारांची सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तब्बल 34 याचिकांवर सुनावणी घेणार आहेत, त्यामुळे शिवसेनेचे 54 आमदार एकाच छताखाली येणार आहेत.वादी आणि प्रतिवादी आमदारांना पुरावे सादर करत म्हणणं मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. यानंतर प्रत्येक याचिकेची वेगळी सुनावणी केली जाणार आहे, त्यावेळी संबंधित आमदारांना बोलावलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांकडे आलेल्या याचिकेच्या सुनावणीवेळी आमदारांना आपलं म्हणणं मांडायला संधी मिळणार आहे.

मग पुढे आमदार आपले पुरावे सादर करतील, तसंच एकमेकांना पुराव्याचे पेपरही देतील. यानंतर विधिमंडळ सर्वांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर याचिकेचं वेगळं इश्यू फ्रेम करेल. विधानभवनात 14 सप्टेंबरला दिवसभर सुनावणी चालणार असून प्रत्येक याचिकेला वेळ ठरवून दिला जाणार आहे.सुप्रीम कोर्टाने निकालामध्ये विधिमंडळातील शिवसेना पक्ष कोण? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला आहे.

यानंतर आता विधानसभा अध्यक्ष शिवसेनेच्या सर्व 55 आमदारांची सुनावणी घेणार आहेत. 2022 साली जून महिन्यामध्ये शिवसेनेत राजकीय भूकंप झाला आणि एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन उद्धव ठाकरेंची साथ सोडली. याचवेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि शिवसेना पक्षावरही दावा केला. निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं.

दुसरीकडे ही लढाई सुप्रीम कोर्टातही सुरू होती. सुप्रीम कोर्टानेही निकालामध्ये विधिमंडळातला शिवसेना पक्ष कोण? हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिला, तर दुसरीकडे निवडणूक आयोगाच्या निर्णयालाही स्थगिती देण्यास नकार दिला. निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधातली सुप्रीम कोर्टातली याचिकेवर सुनावणी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *