देशनवी दिल्ली

सर्वसामान्यांना झटका; गॅस सिलिंडरच्या दरात वाढ

नवी दिल्ली – गेल्या तीन महिन्यांपासून सिलिंडरच्या दरात घसरण होत होती. मात्र, तेल विपणन कंपन्यांनी १ जूनपासून एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे. यामुळे लॉकडाऊनमध्ये  सर्वसामन्यांना आणखी एक झटका बसला आहे.

विना अनुदानित १४ किलोच्या गॅसच्या किंमतीत राजधानी दिल्ली आणि मुंबईमध्ये ११ रुपये ५० पैशांनी वाढ करण्यात आली आहे. तर कोलकात्यामध्ये ३१ रूपये ५० पैसे आणि चेन्नईमध्ये ३७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे दिल्लीमध्ये १४ किलोंचा विनाअनुदानित गॅसची किंमत ५९३ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये ६१६ रुपये तर चेन्नईमध्ये ६०६.५० रुपये झाली आहे. तर मुंबईत १४ किलोच्या विनाअनुदानिक गॅससाठी ५९०.५० रुपये मोजावे लागणार आहेत.

ANI✔@ANI

Prices of non-subsidised 14 kg Indane gas in metros, applicable from today: In Delhi price rises to Rs 593.00 (increase by Rs 11.50/cylinder), in Kolkata – Rs 616.00 (increase by Rs 31.50), in Mumbai – Rs 590.50 (increase by Rs 11.50), in Chennai – Rs 606.50 (increase by Rs 37).

View image on Twitter

दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर एलपीजीच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने भारतातही किंमती वाढवण्यात आल्या आहेत. एक जूनपासून विनाअनुदानित गॅसच्या दरात वाढ अंमलात आणण्यात येणार आहे. मात्र, या दरवाढीचा पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांवर कोणताही परिणाम होणार नाही. पीएमयूवायच्या लाभार्थ्यांना ३० जूनपर्यंत एक विनामूल्य सिलेंडर मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *