लोकसभा निवडणुकीसाठी बीड जिल्ह्यात ईव्हीएम मशीन दाखल
EVM-VVPAT मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी वखार महामंडळ (एमआयडीसी) येथे करण्यात येणार
बीड, दि. 6 (जि. मा. का.) आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी भारत निवडणूक आयोगा कडून बंगलूरू (कर्नाटक) पंचकूला (हरियाणा) येथून EVM मशिन्स प्राप्त झाल्या आहेत.या मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी करण्याचे काम भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानूसार दि. 04 जुलै 2023 पासून यात आले आहे. जिल्हयात प्राप्त एकुण 13272 EVM-VVPAT मशिन्सची प्रथम स्तरीय तपासणी बीड मुख्यालयात वखार महामंडळ (एमआयडीसी) बीड येथिल गोदामात करण्यात येणार आहे.
2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी आयोगाच्या निर्देशानूसार जिल्हा निवडणूक विभागाने तयारी सुरू केली आहे. एकुण 13272 EVM मशिन्सची तपासणी निर्माता कंपनी BELचे एकुण 10 अभियंता, 10 मास्टर ट्रेनर व महसूल प्रशासनातील अधिकारी / कर्मचारी यांच्या निदर्शनाखाली करण्यात येत आहे.
या तपासणीमध्ये सुरुवातीला प्रत्येक मशीनवर 96 मतदान करण्यात येवून त्यांची मोजणी व तपासणी करण्यात येणार आहे. EVM मशिनवरील नमूना मतपत्रिकेवरील 16 उमेदवारांना प्रत्येकी सहा मते दिली जातील व त्याची मतमोजणी केली जाणार आहे. सर्व मशीनवर नोंदवलेले मतदान तपासले जाणार आहे. तसेच रँडमली निवडण्यात आलेल्या 5टक्के मशिनपैकी 1 टक्का मशीनवर 1200 मतदान, 1टक्का मशीनवर 1000 मतदान व 500 मशिनवर 2 टक्के अशा प्रमाणात माँकपोल घेवून मशीन्स तपासण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांनी कळविले आहे.