बीड जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पूर्व पाऊस शेतीच्या कामाला वेग
बीड – रविवारी रात्री बीड जिल्ह्यात सर्वत्र मान्सून पावसाने हजेरी लावली, रात्री उशिरा पर्यन्त पावसाच्या सरी सुरूच होत्या अंबाजोगाईत वादळी वाऱ्याने झाडे कोलमडली असेच वातावरण जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी होते वादळी वाऱ्या मूळे अंबाजोगाई, वडवणी येथील विद्युत पुरवठा खंडित होता, मान्सून पूर्व पावसा मूळे शेतकरी आनंदी झाला आहे शेतीच्या कामाने वेग घेतला आहे
बीड जिल्ह्यात रविवारी सायंकाळी अन रात्री उशिरा सर्वत्र मान्सून पावसाने हजेरी लावली जिल्ह्यात सरासरी 17.12 मी मी पावसाची नोंद झाली आहे,बीड, वडवणी, पाटोदा, आष्टी , केज, अंबाजोगाई, माजलगाव तालुक्यात पावसाने जोर दाखवला, विजेचा कडकडाट अन वादळी वाऱ्यासह पावसाने उन्हाची तीव्रता कमी केली, कालच्या वादळी वाऱ्या मूळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडली , विद्युत तारा तुटल्या अंबाजोगाई , वडवणी येथील वीज पुरवठा खंडित झाला, वातावरणात मोठा उकाडा निर्माण झाला आहे, गेल्या काही वर्षात दुष्काळाचा सामना करणाऱ्या बीड जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस पडल्याने शेती च्या कामाला वेग आला आहे , शेतकरी समाधानी दिसत असून शेतीच्या कामासाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाली आहे