ऑनलाइन वृत्तसेवा

दहावीचा जूनच्या पहिल्या आठवड्यात तर बारावीच्या परिक्षेचा निकाल मे अखेर

बारावीच्या बोर्डाच्या निकाल हा 31 मेला आणि दहावीच्या बोर्डाचा निकाल हा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती ही अध्यक्ष शरद गोसावी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाली असल्याचे देखील त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

मागील आठवड्यात एकाच दिवशी सीबीएसई बोर्डाचा दहावीचा आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार, याबाबत प्रश्न उपस्थित झाले होते. पण आता बारावीचा निकाल हा मे महिन्याच्या अखेरला आणि दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी बोर्डामध्ये नेमके कोण बाजी मारते हे पाहणे देखील तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे.

‘या’ वेबसाईटवर पाहू शकता निकाल..
दहावी आणि बारावीचा बोर्डाचा निकाल जाहीर होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहण्यासाठी विविध वेबसाईट उपलब्ध करून देण्यात येतात. तसेच गेल्या काही वर्षांपासून मॅसेजच्या साहाय्याने देखील विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल सहज उपलब्ध होत आहे. निकाल पाहण्यासाठी https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळासोबत विद्यार्थी किंवा पालक http://mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org आणि http://mahresults.org.in या लिंकवर निकाल पाहू शकतात. तसेच विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्राथमिक माहितीचा तपशील भरून त्यांना Marksheet पाहता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *