ऑनलाइन वृत्तसेवादेशनवी दिल्ली

रुग्णांना केवळ जेनेरिक औषधेच लिहून द्या नसता कारवाई;केंद्राचा डॉक्टरांना इशारा

केंद्र सरकारी दवाखान्यातील, सेन्ट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम (CGHS) वेलनेस सेंटर्समधील तसेच पॉलिक्लिनिक्समधील डॉक्टरांना निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी इथं येणाऱ्या रुग्णांना केवळ जेनेरिक औषधेच लिहून दिली पाहिजेत. याबाबत यापूर्वीही निर्देश देण्यात आले असले तरी डॉक्टरांमार्फत अद्यापही ब्रॅन्डेड औषधेच लिहून दिली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे, याची खातरजमा विशेष यंत्रणेमार्फत करण्यात आली आहे. केंद्रीय सेवांचे महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी १२ मे रोजी काढलेल्या ऑफिस ऑर्डरमध्ये असा उल्लेख केला आहे.

सरकारच्या या निर्देशांचे पालन सर्व सरकारी रुग्णालयांतील सर्व आजारांच्या विभाग प्रमुखांनी केलं पाहिजे. तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या निवासी डॉक्टर देखील याचं पालन करत आहेत की नाही हे ही त्यांनी तपासलं पाहिजे. जर याचं पालन होत नसल्याचं दिसून आलं तर संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्यात येईल, असंही या ऑफिस ऑर्डरमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *