बीड

स्वातंत्र्यवीर सावरकरांनीविज्ञान हाच सर्वश्रेष्ठ धर्म सांगितला;बीडमध्ये शरद पोंक्षे यांचे प्रतिपादन


बीड (प्रतिनिधी) सर्वच धर्मग्रंथ हे आदरणीय, पूजनीय, वंदनीय आहेत परंतु कालानुरूप त्याची चिकित्सा केली पाहिजे. विज्ञान आणि मानवता हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे मानणारे आणि त्यादृष्टीने आचरण करणारे स्वा. सावरकर होते असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेते आणि सावरकर साहित्याचे अभ्यासक शरद पोंक्षे यांनी केले.


येथील सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने श्रोत्यांनी तुडुंब भरलेल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित व्याख्यानात शरद पोंक्षे यांनी आपल्या दोन तासांच्या व्याख्यानात सावरकरांचे चरित्र आणि कार्य अमोघ शैलीत सांगितले तेव्हा समस्त श्रोते स्तब्ध होऊन अन प्रसंगी टाळ्यांचा कडकडाट करीत प्रतिसाद देत होते. पोंक्षे म्हणाले की , स्वा सावरकरांनी काळाच्या पुढचा विचार मांडला होता. त्यांचे बालपण ,लंडनमधील क्रांतिकार्य, अंदमानाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असताना केलेली कामगिरी, 23 हजारापेक्षा जास्त पृष्ठ साहित्याची निर्मिती, जातिभेदाच्या भिंती तोडून आपण सर्व हिंदू आहोत हा विचार कितीतरी वर्षांपूर्वी सावरकरांनी मांडला.


‘जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा’ हे ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. हे सांगताना हिंदू इतका सर्वसमावेशक धर्म अन्य कोणताही नाही हे त्यांनी सांगितले. सावरकरांचे हिंदुत्व हे मानवतावादी आणि सर्वांना सोबत घेऊन जाणारे ‘ वसुधैव कुटुम्बकम’ हा विचार मांडणारे होते.त्यांनी कर्मकांडाला विरोध करून विज्ञानाला धर्म मानण्याची हाक दिली. त्यासाठी त्यांनी इतिहास अभ्यासला जे इतिहास विसरतात त्यांचा भूगोल बिघडतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या थोर संतांचे महापुरुषांचे चरित्र वाचले पाहिजे. फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती, वाचण्याची गरज नाही. 1857 चे स्वातंत्र्यसमर वाचा,रामायण, महाभारत, संत ज्ञानेश्वर, जगद्गुरु तुकाराम महाराज,रामदास स्वामी, संत नामदेव महाराज यांचे चरित्र वाचा त्यांचे विचार हे आजच्या परिस्थितीत समाजाला अत्यंत मार्गदर्शक आहेत. त्यातून आपले व्यक्तिमत्व घडते.स्वा.सावरकरांनी अंदमानत ब्रिटिशांची माफी मागितली असा चुकीचा आणि घृणास्पद वाटणारा प्रचार केला जातो चोख उत्तर दिले गेले पाहिजे. रत्नागिरीमध्ये पतीत पावन मंदिराची निर्मिती करून सावरकरांनी समाज क्रांतीचा डोंगर उभा केला. सर्व धर्मीयांसाठी मंदिर निर्माण केले. बंदीच्या सप्तशृंखला तोडल्या असे ते म्हणाले.शरद पोंक्षे यांनी व्याख्याना दरम्यान केलेल्या राजकीय भाष्यालाही श्रोत्यांनी मनसोक्त दाद दिली.
प्रास्ताविकात वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य पांडव यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन सावरकरांचा विचार समाजापर्यंत मांडण्याचा प्रयत्न वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून केला जात असल्याचे सांगितले या वेळी त्यांनी आगामी काळातील प्रतिष्ठानची वाटचाल ही विषद केली. भारतमाता,छत्रपती शिवाजी महाराज, स्वा.सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली

यावेळी श्री.शरद पोंक्षे, माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर,प्रा.चंद्रकांत मुळे, संपादक दिलीप खिस्ती,दिनकर कदम,डॉ.विवेक पालवनकर, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक,भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर,अध्यक्ष: ॲड.अजिंक्य पांडव,महेश वाघमारे,प्रा.लक्ष्मीकांत बहेगव्हाणकर,प्रशांत सुलाखे, डॉ.गणेश आडगांवकर,हर्षद आडगांवकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन दीप प्रज्वलन करण्यात आले. तत्पूर्वी या व्याख्यानासाठी योगदान देऊन सहकार्य करणाऱ्यांचा स्मृतिचिन्ह आणि सावरकर साहित्य देऊन गौरव करण्यात आला.गेला महिनाभरापासून या व्याख्यानाबद्दल बीडकरांमध्ये उत्सुकता होती ती महिला आणि पुरुषांच्या प्रचंड उपस्थितीने दिसून आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेरक वैद्य यांनी केले तर आभार अमित हसेगावकर यांनी मानले.राष्ट्रगीताने या कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. टाचणी पडली तरी आवाज येईल एवढी शांतता संपूर्ण सभागृहात होती.शहरातील सावरकर प्रेमी मोठ्यासंख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते दोन्ही ही सभागृह हाऊस फुल्ल झालेले होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा.श्रीकांत कुलकर्णी,श्री.संतोष चिंचोलकर,प्रा.नितेश अग्रवाल,श्री मुकुंद कुलकर्णी,श्री.विकास मानुरकर, प्रा.गणेश देशमुख, प्रा.सतीश कुलकर्णी, प्रा.टेपाळे सर, श्री.महेश कुलकर्णी, श्री.राहुल देशपांडे, डॉ.सुहास देशपांडे, डॉ.अजय कुलकर्णी, प्रा.शशिकांत पासरकर, डॉ.प्रसाद वाघिरकर,श्री.गणेश जोशी, श्री.गणेश तालखेडकर, श्री.स्वप्नील देशमुख,श्री.अतुल मुळे,श्री शरद कुलकर्णी, श्री.श्रीराम मांडे श्री.ऋषिकेश कुलकर्णी,श्री.अंकित जोशी, श्री.आनंद रत्नपारखी, श्री.अभीजित निर्मळ,श्री.गोविंद शिवनिकर आदी सावरकर भक्तांनी हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी परिश्रम घेतले याची प्रचिती ही बीडकर जनतेला आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *