नवं शैक्षणिक धोरण; अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांना जोडणार?
राज्यातील तब्ब्ल १ लाख अंगणवाड्या आता प्राथमिक शाळांना जोडण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यातील १ लाख अंगणवाड्या प्राथमिक शाळांना जोडण्याची तशी तयारी सुरू आहे. याकरता राज्यात नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कृती दलाची स्थापना करण्यात येणार आहे. अंगणवाडी आणि खासगी शिशु वर्गातील मुलांसाठी एकच अभ्यासक्रम करण्यात येणार आहे. या सामायिक अभ्यासक्रमाची सुरूवात येत्या जूनपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकच येत्या काही दिवसात राज्यातील १ लाख अंगणवाड्या या प्राथमिक शाळांना जोडण्यात आल्याचे पाहायला मिळणार आहे.