बाजार समिती म्हणजे वाळू, गुटका मटक्याचा अड्डा नव्हे- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर
चांगल्या नेतृत्वाला मदत करणे गैर नाही- गेवराईचे आ लक्ष्मणराव पवार
बीड/प्रतिनिधी
कुठली एखादी संस्था यशस्वीपणे चालवायची असेल तर त्यासाठी मेहनत विश्वासू कार्यकर्ते आणि बहाद्दर मतदार पाठीशी असावे लागतात बाजार समिती म्हणजे टक्केवारी घेऊन वाळू गुटखा मटक्याचा अड्डा नव्हे असा खणखणीत इशारा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दिला आहे तर चांगल्या आणि कणखर असणाऱ्या नेतृत्वाला मदत करणे गैर नाही असे प्रतिपादन गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार यांनी केले आहे
कृषी उत्पन्न बाजार समिती बीड च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज बीड शहरातील वैष्णवी पॅलेस या भव्य सभा मंडपात शेतकरी विकास पॅनल च्या वतीने मतदारांचा जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि गेवराईचे आमदार लक्ष्मणराव पवार,रोहित क्षीरसागर, डॉ योगेश क्षीरसागर,हर्षद क्षीरसागर,राहुल नवले, नितीन लोढा मदनराव चव्हाण अमृत काका सारडा विलास बडगे विनोद मुळूक बाबुशेठ लोढा नगरसेवक अमर नाईकवाडे,अजय मोरे लाला पाटील चौरे चंद्रसेन नवले,फईम सर,ऍड राजेंद्र राऊत,भास्कर जाधव,बाळासाहेब मुंडे,दत्ता डोईफोडे,सतीश पाटील तानाजी कदम सुग्रीव रसाळ आदी मान्यवरांची उपस्थिती होती
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जगदीश काळे यांनी केले तर यावेळी दिनकर कदम,सतीश पाटील,डॉ योगेश क्षीरसागर, यांनी आपले मनोगत व्यक्त करत या निवडणुकीत शेतकरी विकास पॅनलला मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले
यावेळी गेवराईचे आ लक्ष्मणराव पवार म्हणाले की, बाजार समितीचे वैभव टिकून ठेवायचे असेल तर अण्णांच्या ताब्यातच ही बाजार समिती हवी सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देणारे नेतृत्व म्हणून जयदत्त अण्णांकडे आपण बघतो कार्यकर्त्याला मदत करणारा ताकद देणारा नेता हवा असतो बीडची बाजार समिती योग्य उमेदवार देणारी आहे हे काही पक्षाची निवडणूक नाही चांगल्या माणसाला मदत करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे मला कोणाचाही फोन किंवा दबाव नाही पक्ष कार्यालयातूनही मला कुठलीही विचारणा किंवा बंधन करण्यात आलेले नाही जयदत्त अण्णा एक चांगलं नेतृत्व आहे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे मतदारांनी कुठल्याही भूल थापांना बळी न पडता बाजार समितीच्या शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांना निवडून द्यावे,
यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, आज जमलेला मतदार बघूनच मला निकालाची जाणीव झाली आहे येणाऱ्या 28 तारखेला होणाऱ्या मतदानातून आमचा विश्वास सार्थ करणारे ठरेल इथे आलेल्या कुणाला गाड्या करून आणलेले नाही मतदार स्वतःहून आज इथे हजर आहेत हे संस्था शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे हीच भूमिका घेऊन प्रत्येकाला प्राधान्य देऊन आणि निवडणूक लढत आहोत संस्था जगवणे टिकवणे वाढवणे अवघड असते सगळ्या संस्था मोठ्या विश्वासाने आजही ताब्यात आहे संस्था कशा चालवाव्या लागतात याची जाण आणि भान असावी लागते कोणी निंदा कुणी वंदा विकास करणे हाच आमचा धंदा म्हणून प्रत्येक क्षेत्रात विकास करून घेण्यासाठी सातत्याने काम करत त्यासाठी निधी उपलब्ध करून ती कामे केली जात आहे सध्या चमकोगिरी चा धंदा सुरू आहे मतदारांची ताकद हीच आमच्या विश्वासाची पावती आहे सेवा हाच धर्म आहे सत्ता लाटण्याचे नव्हे तर सेवेचे साधन आहे सत्ता मिळाली म्हणून लुटायचा परवाना मिळालेला नसतो काहीजण अशा अविर्भावात स्वतःला मिरवून घेत आहे टक्केवारीवर राजकारण चालू आहे समोरच्याला झटका देण्याची हीच संधी आहे भविष्यात बाजार समितीच्या विकासाबरोबरच अन्य कामे देखील करायचे आहेत निसर्गाने आवश्यक करण्याचा क्रम चालूच आहे कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आपल्या माती लिहिलेला आहे हे बाब लक्षात घेऊन आपण मराठवाड्यासाठी पाणी मिळावे यासाठी मोठ्या प्रकल्पाचा प्रस्ताव आणि मागणी केल्यानंतर त्याला आता मूर्त रूप येऊ लागले आहे 21 तारखेला चिन्ह मिळणार आहे अनेक वावड्या उठतील पण सर्वांनी आपली संस्था आपल्याच ताब्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करायचा आहे बाजार समिती म्हणजे टक्केवारी घेऊन वाळू घुटका मटक्याचा अड्डा नव्हे असा सणसणीत इशारा देऊन हे निवडणूक किती आले गेले तरी आपणच जिंकणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला,यावेळी अरुण डाके,गणपत डोईफोडे,गंगाधर घुमरे,विलास बडगे,अरुण बोंगाणे,सचिन घोडके,नानासाहेब काकडे,सखाराम मस्के,गोरख दंने, गेवराई भाजप शहराध्यक्ष या या खान,दादासाहेब गिरी,राजेंद्र राक्षसभुवनकर,प्रा येळापुरे, रावसाहेब गुजर बाजीराव बोबडे,बंडू लांडे दिलीप आहेर,बबनराव गोरे,सुंदर चव्हाण,अंकुश कळासे,बाळासाहेब नागतीलक,अरुण लांडे,देवीलाल चरखा,प्रभाकर नांदे,बाळासाहेब जाधव,काकासाहेब जोगदंड,मीरा दावकर,हिंगणी सरपंच तांदळे,विलास विधाते,गणेश वाघमारे, भैय्या मोरे,प्रभाकर पोपळे,उद्धव बोरगे,टेकाडे साहेब, शिवाजी घरत, रमेश कागदे, भागवत घरत,आदि उपस्थित होते