ऑनलाइन वृत्तसेवामहाराष्ट्रमुंबई

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय

राज्यातील शिक्षक (Teacher pay) व शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.

शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे त्याचा जीआर म्हणजे शासन निर्णय जारी करणे प्रलंबित होते. तो आज काढण्यात आला असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

या (Teacher pay) निर्णयाची अंमलबजावणी 1 जानेवारीपासून करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने 22 डिसेंबर 2022 रोजी घेतला होता. अनुदानपात्र शाळांना वाढीव टप्पा घोषित करण्याच्या निर्णयाचाही त्यात समावेश होता. दरम्यान, आचारसंहितेमुळे झालेल्या विलंबामुळे शिक्षकांचे नुकसान होऊ नये म्हणून या आदेशाची अंमलबजावणी 1 जानेवारी पासून म्हणजेच एक महिना आधीपासून करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

शिक्षकांचे सुधारित मानधन

  • प्राथमिक, उच्च प्राथमिक १६००० रु.
  • माध्यमिक १८००० रु.
  • उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय २०००० रु.
  • शिक्षकेतर कर्मचारी पूर्णवेळ
    मानधन १४००० रु.
  • प्रयोगशाळा सहायक १२००० रु.
  • कनिष्ठ लिपिक १०००० रु.
  • चतुर्थ श्रेणी कर्मचारी ८००० रु.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *