TAIT परीक्षेची घोषणा;डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांना होणार फायदा,परीक्षेचं कसं आहे वेळापत्रक?
पाच वर्षापासून रखडलेली शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता (TAIT Exam) चाचणीची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेची घोषणा आज झाली आहे. राज्य परीक्षा परिषदेकडून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या निर्णयाचा अनेक डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांनी समाधान व आनंद व्यक्त केला आहे.
दरम्यान, 22 फेब्रुवारी 2023 ते तीन मार्च 2023 या दरम्यान ऑनलाईन शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होणार आहे. उमेदवारांना 8 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मागील पाच वर्षांपासून रखडलेली शिक्षक भरतीसाठी आवश्यक शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी केव्हा होणार? असा प्रश्न डीएड (D.Ed) आणि बीएड (B.Ed) उमेदवारांकडून सातत्याने विचारला जात होता. अखेर त्याची प्रतीक्षा संपली असून राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.
पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अखेरची तारीख आठ फेब्रुवारी अशी आहे. येत्या 22 फेब्रुवारी 2023 ते 3 मार्च 2023 दरम्यान ऑनलाईन अभियोग्यता चाचणी परीक्षा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावे असं सांगण्यात आलं आहे.
कसे आहे वेळापत्रक?
-ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी – 31 जानेवारी 2023 ते 8 फेब्रुवारी 2023
- परीक्षा शुल्क भरण्यासाठी कालावधी – 8 फेब्रुवारी 2023 रात्री 11. 59 पर्यंत
- प्रवेशपत्र ऑनलाईन मिळण्याचा कालावधी- 15 फेब्रुवारीपासून 2023 पासून
- ऑनलाईन परीक्षा तारखा – 22 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत ( उमेदवार संख्येनुसार व उपलब्ध भौतिक सुविधानुसार बदल होण्याची शक्यता आहे.)