बीड

माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा अखेर भाजपा उमेदवार किरण पाटलाना जाहिर पाठीबा


निवडणूक प्रभारी राणा जगजित सिंह पाटलांच्या उपस्थीतीत बैठक


बीड दि (प्रतिनिधी )
मराठवाडा शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकित जाणकराचे लक्ष ज्याच्या भुमीके कड़े लागले त्या माजीमंत्री जयदत्त क्षिरसागरानी शेवटचा क्षणी आपला पाठीबा भाजपा उमेदवार किरण पाटील यांना अधिकृत दिल्याचे जाहिर केल्याने राष्ट्रवादी उमेदवार विक्रम काळेना हा फार मोठा धक्का बसणार . दरम्यान भाजपा निवडणुक प्रभारी राणादादा पाटील यांनी बीडात येवून क्षिरसागरांच्या नवगण कॉलेजात समर्थक सस्था चालकांच्या सोबत बैठक घेतली . या वेळी माजी नगराध्यक्ष डॉ भारतभुषण क्षीरसागर उपस्थीत होते .


या निवडणुकित क्षिरसागरानी आपला पाठीबा कुणालाच जाहिर केला नव्हता . अनेक वर्षा पासून विक्रम काळेना त्यांची मदत होत असे . बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शाळा कॉलेज आणि समर्थक संस्था चालक असून एक हजार मताच्या आसपास त्याची ताकद आहे .राज्याच्या राजकारणात उलथापालथी झाल्यानंतर क्षीरसागर कुणा सोबत? याचे पत्ते अद्याप उघडे झाले नसले तरी मागच्या काही दिवसापासून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांची जवळीक जास्त वाढल्याने कदाचित भाजपमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झाली . या निवडणुकीत शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती . मात्र काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दूरध्वनी संवाद झाल्यानंतर निवडणूक प्रभारी राणा जगजीत सिंह पाटील तातडीने बीडला आले . नवगन कॉलेजमध्ये क्षीरसागर यांच्या आदेशानुसार संस्था चालकांची बैठक राणा यांच्या उपस्थितीत पार पडली . बैठकीला माजी नगराध्यक्ष डॉ .भारतभूषण क्षीरसागर प्राचार्य दीपाताई क्षीरसागर विलासराव बडगे, जगदीश काळे , दिनकर कदम,आदित्य सारडा,जोगदंड यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती . बैठकीत शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवडणूक लढवणारे किरण पाटील यांना जाहीर पाठिंबा देण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला . दरम्यान या निर्णयामुळे विक्रम काळे यांना फार मोठा फटका बसणार असून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किरण पाटलाचा निश्चित फायदा होईल हे मात्र नक्की .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *