कापसाचे भाव वाढणार;नऊ हजार रुपयांचा टप्पा ओलांडला
मागील काही दिवसांपासून दर गडगडल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली होती. यंदा देशातील कापूस उत्पादन कमी असून डिसेंबर नंतर कापसाचे दर सुधारू शकतो याचा अंदाज व्यक्त केला होता
शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9000 रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यांने विक्री केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.
तसेच बाजार समितीत आवकही वाढल्याचे चित्र दिसून येत आहेत आगामी काही दिवसात पुन्हा कापसाचे दर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, कापसाचा हंगाम दिनांक एक ऑक्टोंबर पासून सुरू झालेला आहे परतीच्या पावसामुळे हंगाम लाभला आहे दिवाळीपूर्वीच कापसाचे दर दबावत होते हंगामाच्या प्रारंभी काही दिवस कापसाचे बाजार भाव प्रतिक्विंटल सात हजार ते आठ हजार रुपयांच्या घरात होते.
दिवाळी सणा नंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर वाढल्याने देशातील कापूस बाजाराला आधार मिळाला त्याचा फायदा क्विंटल मागे जवळपास 300 ते 400 रुपयांची सुधारणा पाहण्यासाठी मिळालेली होती, कापसाच्या दरातील वाढ पुढील काही दिवस टिकून राहील असा अंदाज काय जानकर व्यक्ती करत आहे.
तेव्हा कापसाचे दर हे दहा हजाराच्या उंबरठ्यावरती पोहोचलेले होते मात्र त्यानंतर कापसाच्या दरात घसरण सुरू झाल्याने बाजार फिरवलेला होता, आता पुन्हा कापसाच्या दारात किंचित वाढ झालेल्या असून नऊ हजार रुपयांचा टप्पा कापसाने गाठलेला आहे गेल्या चार दिवसांमध्ये कापसाच्या दरात दोनशे तीनशे रुपयांची प्रतिक्विंटल मागे वाढ झाली ते दिसून येत आहे.
ग्रामीण भागात शेतकऱ्यांचा कापूस अजूनही घरातच आहे,स्थानिक व्यापारी बाहेरच्या व्यापाऱ्यांना गावात येऊ देत नाहीत आणि कापसाला भाव वाढ देत नाहीत अशी परिस्थिती आहे,शासनाने सरसकट प्रति क्विंटल 10 हजाराने कापूस खरेदी सुरू केली तर शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि व्यापारी देखील भाववाढीने कापूस खरेदी करतील असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे
कापसाला चांगला भाव मिळण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा
यंदा राज्यात कापूस उत्पादन चांगलं झालं आहे. मात्र, सध्या कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री न करता आपल्या घरात कापूस ठेवावा लागत आहे. कापसाला चांगला भाव मिळण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहेत. यामुळे राज्यातील कापसावर प्रक्रिया करणारे जवळपास 80 टक्के जिनिंग बंदच आहेत. राज्यात सुमारे 500 च्यावर जिनिंग आणि त्यात काम करणारे सुमारे 3 लाख मजूर आहेत. ज्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे.