सहकारी संस्थांच्या निवडणुका ग्रामपंचायतींमुळे लांबणीवर
राज्यात सद्यस्थितीत 7 हजार 751 ग्रामपंचायती, तर 7 हजार 147 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. दोन्ही निवडणुका एकाच वेळी होत असल्याने गावागावांमध्ये तणावग्रस्त परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच सहकारी संस्थांचे कार्यक्षेत्र एक किंवा अनेक तालुक्यांशी संबंधित असल्यामुळे बरेचशे मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने अ आणि ब वर्गातील सुमारे दोन हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित ठेवून दि.20 डिसेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
आजचा लोकांक्षा
विविध कार्यकारी सोसायटी, साखर कारखाने, बाजार समित्या आदी सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. सहकारी संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्रामीण भागातील संस्थांचे सभासद मतदान करतात. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीसाठीसुद्ध मतदान होणार आहे. या सर्व संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम हे एकाच कालावधीत असल्याने जास्तीत जास्त मतदारांना निवडणुकीत सहभाग नोंदविता यावा, यासाठी अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. याबाबतचे आदेश सहकार विभागाचे सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांनी जारी केले आहेत.