बीड

ऊस तोडल्यासारखे पुतण्याने चुलत्याला तोडले:क्रूरतेच्या बाबतीत बीडने बिहारलाही लाजवले

वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथे चुलत्या पुतण्याच्या जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत पुतण्याने चुलत्याला तोडल्याचे वृत्त दैनिक पार्श्वभूमीने प्रकाशित केले आहे त्याचबरोबर प्रियकरासह पळून जाताना अडथळा आणला म्हणून मामाच्या मुलीला विहिरीत ढकलण्याची घटना धारूर तालुक्यातील कासारी या ठिकाणी घडली आहे

मुळकवाडीत थरार जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलत्याचा खून चुलती गंभीर

बीड तालुक्यातील मुळूकवाडी येथे शेतीच्या वादातून शनिवारी पहाटे बळीराम निर्मळ यांच्यासह पत्नी केशव निर्मळ यांच्यावर पुतण्या रोहिदास निर्मळ यांनी कोयत्याने हल्ला चढवला जीव वाचवण्यासाठी बळीराम धावत सुटले होते रस्त्यावरच रोहिदास ने सपा सफ वार केल्याने ती जागीच मृत्यू पडले यामध्ये चुलती ही गंभीर जखमी झाल्याचे वृत्त दैनिक झुंजारनेता ने प्रकाशित केले आहे
तर प्रसिद्ध अभिनेते विक्रम गोखले यांच्या निधनानंतर विक्रमास्त या प्रमुख हेडिंग चे वृत्तही दिले आहे

दुहेरी हत्याकांडाने जिल्हा हादरला
पिंपरखेड मध्ये काकाने पुतण्याला मारले तर मुळूकवाडी पुतण्याने काकाला संपवले पोलिसांचा धाक कुठे आहे?
अशी हेडलाईन दैनिक लोकप्रश्न ने प्रकाशित केली आहे एकाच दिवशी दोन घटना घडल्या असून लोकांना पोलिसांचा आणि कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे
स्थानिक स्वराज्य च्या निवडणुका तातडीने घेण्याची मागणी याचिका करते उल्हास संचेती यांनी मुख्यमंत्र्याकडे केली असल्याची वृत्त असून मित्रासोबत पळून जाताना पाहिल्याने मामाच्या मुलीला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याची घटना ही ठळकपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे

जमिनीच्या वादातून चुलत्याचा खून चौघांवर हल्ला चुलती गंभीर
दैनिक प्रजापत्रने आपल्या मुख्य बातमीची हेडिंग केली आहे तर ट्रॅक्टर वरून पडल्याने तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी नजीक घडली असल्याचे वृत्त आहे

ग्रामपंचायत साठी उमेदवार शोधताना पॅनल प्रमुखांची तारांबळ
सरपंचाची निवड थेट असल्याचा फटका हे वृत्त प्रकाशित करून प्रजापत्रने निवडणुकीतील परिस्थिती मांडली आहे

शेतीच्या वादातून मुळुकवाडीत अंगात सैतान घुसलेल्या कडून कोयत्याने चुलता चुलतीवर सपास 80 वर्षीय चुलत्याचा जागीच मृत्यू तिघेजण गंभीर असल्याचे वृत्त दैनिक चंपावतीपत्र हे प्रकाशित केले आहे

तर विक्रमी पडदा पडला!
मराठी रंगभूमी चित्रपटसृष्टी आणि हिंदी सिनेमा विश्वात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनय कौशल्याने स्वतःची स्वतंत्र ओळख प्रस्थापित करणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे वृत्त दैनिक चंपावतीपत्रणे ठळकपणे प्रकाशित केले आहे

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटला
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्राच्या बसेस अडवल्या सीमा भागात तणाव
वृद्ध काका काकू घरात असताना तो आला आणि अंगणात रक्ताचा सडा ट्रॅक्टर पडल्याने पंधरा वर्षी मुलाचा मृत्यू शिरूर तालुक्यातील फुल सांगवी येथील घटना अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड या प्रमुख आशयाच्या बातम्या दैनिक दिव्यअग्नी यामध्ये प्रकाशित करण्यात आल्या आहेत

गेवराईत अवैद्य वाळू चा धंदा सुरूच आज महसूल पथकाची कारवाई पाच ट्रॅक्टर केनीसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची बातमी दैनिक संकेत मध्ये प्रकाशित झाली आहे तर शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्याला चार मंत्री आणि दोन आमदारांची दांडी या प्रमुख वृत्तासह गुलाबी थंडीत परळी मतदारसंघातील वातावरण तापले असून मित्राच्या मदतीने तरुनाने केला मामाच्या मुलीचा विहिरीत ढकलून खून हे वृत्तही संकेतने दिले आहे

तुकाराम ते एकनाथ महाराष्ट्राचा उलटा प्रवास या प्रमुख हेडिंगसह बीड येथे राज्य नाट्य स्पर्धा होणार असल्याची वृत्त दिव्य लोकप्रभामध्ये प्रकाशित करण्यात आले आहे

जीएसटी भरपाई चे बारा हजार कोटी राज्याला मिळणार असल्याचे वृत्त दैनिक युवा सोबती मध्ये प्रकाशित झाले असून जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलताचुलतीवर कोयत्याने हल्ला प्रशिक्षण देणारा विभाग मृत्यूवर आणि नटसम्राट गोखले आनंदात विलीन या प्रमुख बातम्या यामध्ये प्रकाशित झाल्या आहेत

काँग्रेसची गाय कसायाच्या दावणीला
पक्षाच्या जागेवर कुरेश कोट्याधीश, गांधी भवन कुठे?
जमिनीसाठी पुतण्या उठला चूलता-चूलतीच्या जीवावर दैनिक लोकाशाने हे प्रकाशीत केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *