कापसाचे भाव वाढले:कमाल दर ९ हजार ५०० प्रति क्विंटल
कापूस दराने ८८.२ सेंटपर्यंत मजल मारली. देशातही कपसाचे दर ६ हजार ५०० रुपयांपर्यंत कमी झाले होते. कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्री कमी केली होती. त्यामुळे दरात वाढ होत कापसाने सरासरी ८ हजार ८०० रुपयांचा टप्पा गाठला. तर कमाल दर ९ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले. तर दुसरीकडे कापडाला उठाव नसल्याची चर्चा अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे कापसाच्या दरात चढ-उतार होऊ शकतात, असाही अंदाज काही अभ्यासक व्यक्त करत आहेत. पण शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असं आवाहन जाणकारांनी केलंय.
कापसाच्या दरात आजही क्विंटलमागे १०० रुपयांची सुधारणा पाहायला मिळाली. मात्र कापसााची आवक वाढलेली नाही, असं उद्योगांनी सांगितलं. आज कापसाचा किमान दर काही राज्यांमध्ये वाढला होता तर कमाल दरानेही काही ठिकाणी उसळी घेतली होती.
देशातील बाजारात दिवाळीनंतर कापसाची आवक कमी झाली. त्यामुळं बाजारात कापसाचे दर वाढले आहेत. त्यातच उद्योगांनी आता कापसाची खेरदी सुरु केली. परिणामी कापसाची दरवाढ सुरुच आहे. सध्या कापसाला सरासरी ८ हजार २०० ते ९ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय.
तिकडं आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचे दर वाढत आहेत. त्यामुळं देशातील कापूस दरवाढ कायम राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. शेतकऱ्यांना यंदा किमान सरासरी ९ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेूऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील जाणकारांनी केलंय.