शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:आणखी दोन हजाराची रक्कम जमा होणार
नवी दिल्ली : शेतकऱ्यांना प्रोत्सहान मिळावं आणि आर्थिक मदत देता यावी, यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजना सुरु केलीय. केंद्र सरकार या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यात या योजनेचा 12 वा हफ्ता जमा झालेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात 12 वा हफ्त्याची रक्कम पाठवली आहे. मात्र काही कारणांमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झालेली नाही. तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल आणि खात्यात हफ्ता जमा झाला नसेल, तर यामागील नक्की कारण काय आहे हे जाणून घ्या.
नक्की कारण काय?
याआधी या योजनेचा अनेकांनी गैरफायदा घेतलाय. त्यामुळे गरजु लाभार्थ्यांना याचा फायदा मिळावा, यासाठी सरकारने इकेवायसी बंधनकारक केलं. मात्र काही लाभार्थ्यांनी इकेवायसी केली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात 12 व्या हफ्त्याची रक्कम आली नाहीये. 12 व्या हफ्त्याची रक्कम 30 नोव्हेंबरपर्यंत येईल. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे बीजारोपण झालेले नाही. त्यांनी जवळच्या कृषी केंद्रावर दस्तऐवज अपडेट करुन घ्यावं.
दरम्यान शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. आत्तापर्यंत देशभरातील 2 लाख कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधान किसान योजनेचे 2 हजार रुपये ट्रान्सफर केले आहेत. मोदींनी 17 ऑक्टोबर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले आहेत.