बीड जिल्हा परिषद अध्यक्षपद अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव
बीड, दि. 12, (जि. मा. का.) :- महाराष्ट्र राज्य ग्राम विकास विभाग अधिसूचना शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022 अन्वये राज्यातील 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदाच्या आरक्षणाबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद हे अनुसूचित जाती या प्रवर्गाकरिता राखीव करण्यात आले आहे. उपरोक्त अधिसूचनेनुसार जिल्हा परिषदांकरिता त्यांना सध्या लागू असलेल्या आरक्षणाच्या कालावधीच्या समाप्तीच्या दिवसाच्या लगतनंतरच्या दिवसापासून सुरु होणाऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी हे आरक्षण असणार आहे.
या अधिसूचनेत दिल्यानुसार आरक्षण राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या पुढीलप्रमाणे – अनुसूचित जाती अ) अनुसूचित जातीसाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, ब) अनुसूचित जाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, अनुसूचित जमाती अ) अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 3, ब) अनुसूचित जमाती (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 2, नागरिकांच्या मागासवर्गाचा प्रवर्ग – अ) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्गासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 4, ब) नागरिकांच्या मागासवर्गाच्या प्रवर्ग (महिला) यांच्यासाठी (विमुक्त जाती व भटक्या जमातीसह) राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 3, सर्वसाधारण अ) सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 9 ब) सर्वसाधारण प्रवर्गातील (महिला) यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पदांची संख्या – 9.