आता फोनवर हॅलो नाही तर वंदे मातरम म्हणा :राज्य सरकारचा जीआर
उद्या 2 ऑक्टोबर म्हणजेच महात्मा गांधी यांची 153 वी जयंती आहे. गांधीजींची जयंती संपूर्ण देशात साजरी केली जाते. याच पार्श्वभूमीवर राज्यसरकारने एक नवीन आभियान राबण्याचा निर्णय घेतला आहे.
एवढंच नाहीतर, याबाबतचा आज जीआर काढण्यात आहे असल्याची माहिती, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना फोनवरुन आता ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ या शब्दांनी अभिवादन करावे लागणार आहे. याची घोषणा राज्याचे सांस्कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती.
तसेच या नव्या अभियानाला वर्ध्यातून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की,राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ‘हॅलो नव्हे- वंदे मातरम्’ अभियानाचा शुभारंभ वर्धा येथून होत आहे. यासाठी जनतेला आवाहन करणारे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. हे अभियान यशस्वी करण्याचा निर्धार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.