ठाकरेंचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच:न्यायालयाने दिली परवानगी
यावर्षी 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क हे मैदान मिळावे यासाठी शिवसेना आणि शिंदे गट दोघांनीही परवानगी मागितली होती मात्र मुंबई महानगरपालिकेने दोघांनाही ही परवानगी नाकारली त्यामुळे शिवसेनेच्या वतीने न्यायालयात धाव घेण्यात आली. आज मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे गटाला म्हणजेच शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे परवानगी दिली आहे त्यामुळे शिंदे गटाला मोठा दणका बसला आहे
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळली
दसरा मेळाव्यात नेमका कुणाला अनुमती द्यावी या मुद्द्यावर अखेर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. मुंबई हायकोर्टात मुंबई महापालिका, एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट या तीनही पक्षकारांकडून युक्तीवाद केला. तीनही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने निकाल वाचनाला सुरुवात केली. मुंबई हायकोर्टाने शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची मध्यस्थी याचिका फेटाळली. अर्ज नाकारण्याचा पालिकेचा निर्णय योग्य होता. कायदा-सुव्यवस्थेचा विचार करुनच पालिकेने परवानगी नाकारली, असं निरीक्षण कोर्टाने नमूद केलं. यावेळी पालिकेने 2017 मध्ये कशी परवानगी दिली हे पाहवं लागेल, असं न्यायाधीश म्हणाले. 2016 च्या आधी शिवसेनेला परवानगी मिळाली होती. शिवाजी पार्कवर दसरा मेळावा अनेक वर्षांपासून होतोय. खरी शिवसेना कुणाचा यात आम्हाला जायचं नाही. 22 आणि 26 दोन्ही तारखेचे अर्ज पालिकेला आलेले होते. पालिकेकडून शिवसेनेला प्रतिसाद न मिळाल्याची याचिका आहे, असं न्यायाधीशांनी नमूद केलं.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट आज मुंबई हायकोर्टात पोहोचला. दोन्ही गटाला दसरा मेळावा घ्यायचा आहे. दोन्ही गटाला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदान अर्थात शिवतीर्थ येथे दसरा मेळावा घ्यायचा आहे. त्यासाठी दोन्ही गटाकडून मुंबई महापालिकेकडे परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला होता. पण सुरक्षेचा विचार करुन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहू नये म्हणून मुंबई महापालिकेने दोन्ही गटाला शिवतीर्थ येथे दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाकारली. पण याच मुद्द्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटाने मुंबई हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर आज मुंबई हायोर्टात शिंदे गट, ठाकरे गट आणि मुंबई महापालिकेकडून युक्तीवाद करण्यात आला. तीनही बाजूचा युक्तीवाद संपल्यानंतर कोर्टाकडून लगेच निकाल वाचण्यात आला.