अतिवृष्टी नुकसानीसाठी मराठवाड्याला 1106 कोटी मंजूर :मात्र बीड जिल्हा वगळला
मराठवाड्यात सलग चौथ्या वर्षे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगामा गेला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टी, पुरासह गोगलगायमुळे तब्बल 10 लाख 81 हजार 761.18 हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे नुकसानभरपाईची मागणी होत होती. दरम्यान सरकराने राज्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागासाठी 3 हजार कोटी रुपयांची घोषणा केली होती. आता मराठवाडा विभागासाठी 1106 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. तर उद्यापासून म्हणजेच गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहे.
औरंगाबाद, बीड सध्या वगळले
मदतीचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत तहसील कार्यालयांच्या बीडीएसवर जमा होईल. त्यानंतर तो बँकांमार्फत शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. औरंगाबाद व बीड जिल्ह्यांत अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची नोंद नसल्याने मदतीमधून सध्या हे दोन जिल्हे वगळण्यात आल्याचे प्रशासकीय सूत्रांकडून सांगण्यात आले.
आजचा लोकांक्षाचा अंक