ऑनलाइन वृत्तसेवा

दोन दिवसात मान्सूनचा परतीचा प्रवास:बीड जिल्ह्यात येलो अलर्ट

जुलै महिन्यात सुरू झालेल्या पावसाने जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात थैमान घातले. यानंतर काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मात्र पावसाने राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावली. दरम्यान मागच्या काही दिवसांपासून राज्याती काही भागात पाऊस थांबला आहे तर काही भागात विजा, मेघगर्जनेसह पाऊस पडत आहे.येत्या दोन दोन दिवसात बीड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यात येलो अलर्ट जाहीर करण्यात आल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे

वादळी पावसाचे सावट कायम असल्याने आज (ता. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, घाटमाथा आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

आज (ता. 20) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा तसेच उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. वायव्य भारतातून मान्सूनच्या परतीच्या प्रवासासाठी पोषक हवामान होत असून, उद्यापर्यंत (ता. 21) राजस्थान, पंजाब, हरियाणा आणि कच्छच्या काही भागातून मान्सून माघार घेण्याची शक्यता आहे. यातच पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून 5.8 किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत.

आज (ता. 20) ओडिशाच्या किनाऱ्याकडे येताना, या प्रणालीची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. दरम्यान राज्यात विजांसह पावसाचा इशारा येलो अलर्ट नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या भागात देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *