सौ.के.एस.के.(काकू) अन्नतंत्र आणि कृषि महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी दि.१५ सप्टेंबरपासून सुरवात
बीड – १२वी पास विद्यार्थ्यांसाठी अन्नतंत्र व कृषि शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया दि. १५ सप्टेंबर २०२२ पासून सुरू होणार असून प्रवेश अर्ज सादर करण्याचा कालावधी दि. १५ ते २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत आहे, १२ वी सायन्स (PCM/PCBM) ग्रुप उत्तीर्ण आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ज्या विद्यार्थ्यांनी राज्य सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET) परीक्षा तसेच अभ्यासक्रमांशी संबंधित राष्ट्रीय प्रवेश परीक्षा (JEE आणि NEET) दिलेल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांनी अन्नतंत्र (बी.टेक. फूड टेक्नॉलॉजी) व कृषि (बी.एस.सी. ऑनर्स. अॅग्री) शिक्षणासाठी प्रवेश घ्यावयाचा आहे अशा विद्यार्थ्यांनी www.mahacet.org / www.mcaer.org / https://ug.agriadmissions.in या संकेतस्थळावर जाऊन विहित लिंकवर क्लिक करुन नाव नोंदणी करावी. किंवा वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ संलग्न असलेल्या सौ.के.एस.के. (काकू) अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय म्हसोबा फाटा, नगर रोड, बीड या ठिकाणी प्रवेशासाठी त्वरित संपर्क साधावा.
. संपूर्ण प्रवेश प्रक्रिया अन्नतंत्र व कृषि महाविद्यालय, म्हसोबा फाटा, नगर रोड, बीड येथे महाविद्यालयाच्या प्रशासकीय इमारती मध्ये सकाळी ९ ते सायं. ६ पर्यंत चालू राहील. विद्यार्थी व पालकांनी सौ.के.एस.के. (काकू) अन्नतंत्र आणि कृषि महाविद्यालय म्हसोबा फाटा, नगर रोड, बीड या ठिकाणी ऑनलाईन प्रवेश फॉर्म भरण्याच्या सर्व सुविधा विनामुल्य (मोफत) उपलब्ध आहे. तरी विद्यार्थ्यांनी कागदपत्रासह उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा आणि आपला प्रवेश निश्चित करावा असे महाविद्यालयातर्फे आवाहन करण्यात येत आहे. संपर्कासाठी फोन नं.: ९४२००२५०५२ / ९४०५१८८८१७/ ९८२२७७५२५५/९४२१६१८७९०