“देवा तु सांगना कुठे गेला हरवून ?”सुंदर रांगोळी रेखाटून सुधीर जोशीनी केल्या भावना व्यक्त
श्रीराम मंदिरात लवकरात लवकर मुर्त्यांची प्राण प्रतिष्ठा व्हावी – सुधीर जोशी
जांब समर्थ/हारून शेख
श्रीक्षेत्र जांबसमर्थ येथील समर्थ रामदास स्वामी यांच्या देवघरातील श्रीरामचंद्र, सीतामाता, लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तींची चोरी होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला असून पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. आज पर्यंत जांबसमर्थ येथील ग्रामस्थांनी विविध प्रकारची आंदोलन करून शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. गावकऱ्यांच्या भावना ह्या दिवसेंदिवस तीव्र होत चालल्या आहेत.
अशातच गौरी पूजनाचे औचित्य साधून जांब समर्थ येथील रहिवासी व जालना येथे कार्यरत असलेले कला शिक्षक श्री.सुधीर जोशी यांनी श्रीराम मंदिरातील गाभार्याची सुंदर अशी रांगोळी त्यांच्या राहत्या घरी रेखाटली आहे. ज्यात विना मूर्तीचा गाभारा दिसत आहे.
श्रीराम मंदिरात जवळ्पास सहाशे वर्षापासून ऐतेहासीक महत्त्व असलेल्या मूर्तीची चोरी झाली तो आमचा इतिहास आम्हाला परत मिळावा आणि मंदिरात मूर्तीची प्राणतिष्ठा व्हावी अशीही अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर या गोष्टीचा छडा लावावा असही ते या वेळी म्हणाले.
यावेळी त्यांचे वडील श्रीधर जोशी, बंधू सचिन जोशी, कैलास तांगडे यांची उपस्थिती होती.