खा संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
मुंबई : ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय. ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. राऊतांना हृदयविकाराचा त्रास असल्याने रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करण्यास कोर्टाने मज्जाव केलाय. दुसरीकडे पत्रा चाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचं ईडीच्या वकिलांनी ठासून सांगितलं.
वकील आणि पत्रकारांची कोर्टाबाहेर प्रचंड गर्दी झाली होती. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण ठेवणे मुश्किल झाले होते. पोलिसांच्या अत्यंत ढिसाळ नियोजनामुळे विशेष न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांच्या कोर्ट नंबर १६च्या बाहेर वारंवार धक्काबुक्की झाली. यात महिला पत्रकार व महिला वकिलांचेही प्रचंड हाल झाले.