बीड

डाक विभागाकडून डायरेक्ट एजंट पदासाठी 4 ऑगस्टला मुलाखती

बीड, दि. 28 (जि. मा. का.) : बीड डाक विभागाकडून डाक जीवन विमा (पीएलआय) आणि ग्रामीण डाक जीवन विमा(आरपीएलआय) योजने तर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) च्या भरतीकरिता 04 ऑगस्टला मुलाखती घेण्यात येत आहेत.

या पदासाठीचा अर्ज डाकघर अधिक्षक कार्यालय, बीड विभाग, बीड येथे उपलब्ध आहे. यासाठी उमेदवाराचे वय मुलाखतीच्या दिवशी कमीत कमी 18 वर्षं व जास्तीत जास्त 50 वर्ष दरम्यान असावे. अर्जदाराने दहावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ज्यात केंद्रीय/राज्य मान्यता प्राप्त घेतली आहे.

बेरोजगार, स्वयंरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ती , महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्राम पंचायत सदस्य इत्यादि थेट अर्ज करू शकतात. उमेदवाराची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून, यामध्ये व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्त्व, जीवन विमा बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती इ. बाबी अपेक्षित आहेत.

निवड झालेल्या उमेदवारास रु. पाच हजारची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएसके किंवा केवायपीच्या स्वरूपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरूपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केली जाईल. सदर परीक्षा तीन वर्षांच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील.

सर्व इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरून दि. 04.08.2022 रोजी कार्यालयीन वेळेत 9.30 ते 6:00 पर्यंत अधीक्षक डाकघर, खडकपुरा बीड विभाग, बीड 431122 येथे थेट मुलाखतीसाठी हजर राहावे. सोबत बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्रे / अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *