जायकवाडीचे 18 दरवाजे दीड फुटाणे उघडले:नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन
जायकवाडी प्रकल्प, नाथसागर जलाशय, पैठण दि. 26-07-2022 वेळ: 14.00 Hrs. वाजता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे तो खालील प्रमाणे
🔸 विसर्ग वाढ:-
ठिक 16:00 ते 16:30 वा. दरम्यान द्वार क्र. 10 ते 27 असे एकुण 18 द्वारे 1.0 फुट उंचीवरून 1.5 फुट उंचीवर करुन गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक विसर्ग वाढवण्यात येईल.
अशाप्रकारे गोदावरी नदीपात्रात
1) धरण सांडव्याद्वारे 18864+9432 = 28296 क्युसेक व
2) जलविद्युत केंद्रातून 1589 क्युसेक
असा एकुण 29885 क्युसेक विसर्ग सुरू राहील.
तसेच ठिक 14:00 ते 14:30 वा. दरम्यान उजव्या कालव्यात 50 क्युसेक विसर्ग वाढवून 550 क्युसेक कालवा मुखाशी स्थिर करण्यात येईल.
धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
🛑नदीकाठच्या गावांनी सतर्क रहावे.🛑