द्रौपदी मुर्मू देशाच्या नव्या राष्ट्रपती:देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या
नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. आज राष्ट्रपतिपदासाठीच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली. त्यामध्ये द्रौपदी मुर्मू या मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत. त्या देशातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. त्या देशाच्या १५ व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत.
राष्ट्रपतिपदासाठी १८ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी झाली. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांच्यात लढत होती. द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. या निवडणुकीत ७१९ खासदारांसह देशभरातील ४ हजारांहून अधिक आमदारांनी मतदान केले होते. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे येत्या २४ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत.
द्रौपदी मुर्मू या झारखंडच्या माजी राज्यपाल आहेत. मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. द्रौपदी मुर्मू या स्वतंत्र भारतातील पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. तर, दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. यूपीएच्या काळात काँग्रेसनं प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदाव संधी दिली होती.
द्रौपदी मुर्मू या ओदिशा राज्यातील आहेत. झारखंड राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. झारखंडच्या राज्यपाल म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणाऱ्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं आहे.
द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रायरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भाजपमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विविध पदांवर काम केलं आहे.