बीड

बीड जिल्ह्यात कोरोनाचे 14 पॉझिटिव्ह रुग्ण:उपचाराधीन रुग्ण संख्या 49

बीड जिल्ह्यात आज दि 17 रोजी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये बीड जिल्ह्यातील 463 जणांच्या तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 14 जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले तर 449 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे

आजच्या अहवालात आढळलेले रुग्ण

जिल्ह्यात अंबाजोगाई 1 आष्टी 1,केज 1 माजलगाव 1 परळी 7 शिरूर 2 वडवणी 1 असे रुग्ण आढळून आले आहेत

जिल्हयात उपचाराधीन रुग्ण संख्या 49 असून आज 2 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना स्वतःची काळजी घ्यावी शक्यतो मास्क वापरावा,वयस्कर व्यक्तींनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे,पावसाळा असल्याने साथीचे रोग होऊ नयेत यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे

(वरील कोरोना अपडेट हे गेल्या 24 तासातील आहे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *