ऑनलाइन वृत्तसेवाऔरंगाबाद

मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी:52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान

पावसाळा सुरु झाल्यापासून आतापर्यंत मराठवाड्यातील 172 मंडळात अतिवृष्टी झाली आहे. ज्यात 687 घरांची पडझड झाली असून, विभागातील 52 हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले आहे.

गेल्या दीड महिन्यात मराठवाड्यात 381 मिलिमीटर पाऊस झाला आहे. तर यावेळी सुरवातीलाचा 90 मंडळात 1 वेळ अतिवृष्टी झाली असून, 52 मंडळात दोनदा, 26 मंडळात तीन वेळा, 11 मंडळात चार वेळा आणि 3 मंडळात पाचवेळा अतिवृष्टी झाली आहे. तसेच प्राथमिक अहवालानुसार मराठवाडा विभागात 687 घरांची पडझड झाली आहे.

1 औरंगाबाद 271 मिलिमीटर 18
2 जालना 330 मिलिमीटर —
3 बीड 305 मिलिमीटर 07
4 लातूर 348 मिलिमीटर 35
5 उस्मानाबाद 283 मिलिमीटर 29
6 नांदेड 588 मिलिमीटर 453
7 परभणी 364 मिलिमीटर 08
8 हिंगोली 475 मिलिमीटर 132

आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण…

मराठवाड्यात आतापर्यंत 85 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, 48 लाख 57 हजार 152 पैकी 41 लाख 43 हजार 478 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ज्यात औरंगाबाद जिल्ह्यात 5 लाख 93 हजार हेक्टर, जालना 5 लाख 84 हजार हेक्टर, बीड 6 लाख 50 हजार, लातूर 4 लाख 28 हजार, उस्मानाबाद 4 लाख 3 हजार, नांदेड 6 लाख 95 हजार, परभणी 4 लाख 57 हजार तर हिंगोली जिल्ह्यात 3 लाख 30 हजार हेक्टरवरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *